Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 9:44 AM

अमरावती : भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

फडणवीसांचा अमरावती दौरा

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते हिंसाचारात दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरातही जाणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडे 12 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहनं आणि दुकानांचंही नुकसान झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलीये. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच, शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

अकोल्यातही 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी

त्रिपुरा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद अकोल्यातही दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व नियम कायम आहेत. पण यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. मात्र. आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप

राज्यात कुठेही दंगल झाली तरी भाजपच्या माथी लावण्याचं ठाकरे सरकारचं काम, भाजपचा आरोप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.