AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला पुन्हा धक्का, रत्नागिरीत राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांचा पक्ष प्रवेश

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या (Dapoli Nagarpanchayat) शिवसेनेच्या  (Shivsena) नगराध्यक्षा परवीन शेख (Parvin Shaikh) यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश (NCP) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात येते आहे.

शिवसेनेला पुन्हा धक्का, रत्नागिरीत राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांचा पक्ष प्रवेश
Dapoli NCP
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 8:40 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या (Dapoli Nagarpanchayat) शिवसेनेच्या  (Shivsena) नगराध्यक्षा परवीन शेख (Parvin Shaikh) यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश (NCP) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात येते आहे.

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का

रायगड कोलाड येथे रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या शहरातील राजकरणात मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली आहे. निवडणुका होईपर्यंत असे पक्षीय अदलाबदल घडामोडी घडत राहतील हे निश्चित आहे.

पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपदी विराजमान

पाच वर्षांपूर्वी परवीन शेख यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत परवीन शेख यांनी संचिता जोशी यांचा केवळ 11 मतांनी पराभव केला होता. आपल्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतच त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. परवीन शेख यांनी 2016 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन काँगेस नेते बाळासाहेब बेलोसे यांनीही त्यांना राजकरणात आशीर्वाद दिला होता.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा सुनील तटकरेंचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत आणण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडत थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय.

भास्कर जाधवांचा तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न

मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या पाच कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेवर आमदारकीची जागा देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. त्यावरून भास्कर जाधवांनी तटकरेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची 2024 साली रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनील तटकरे यांनी द्यावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी तटकरे यांना देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाटी सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतल्याने कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची 2024 विधान परिषदेची जागा कुणबी समाज्याला द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केलीय. त्याच बरोबर कुणबी समाज्यावर सुनील तटकरे यांचे प्रेम आहे की आपल्या घराण्याकरिता प्रत्येक गोष्ट करत आलेत हे सिद्ध करण्याची ही नामी संधी असल्याचं विधान करत टोला लगावलाय.

संबंधित बातम्या :

जालन्यात काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.