AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जालन्यात काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
काँग्रेस नेते सुधाकर निकाळजे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 11:37 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यासारखी शहरे राष्ट्रवादीमय करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असं जयंत पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले. (Sudhakar Nikalje from Jalna joined NCP in the presence of Janyat Patil)

आपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. आगामी निवडणुकीत आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत राजेश टोपे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

सुधाकर निकाळजेंसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

यावेळी सुधाकर निकाळजे यांच्यासह विजय बनकर, नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते राजू दळे, भिमशक्तीचे रोहिदास गंगातिवारे, संतोष उन्हाळे, कैलास बनसोडे, भिमसेना पँथर पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर अख्तर, भिमशक्तीच्या जिल्हाध्यक्षा विशाखा सिरसाळ, धामगांवचे सरपंच अनिल साळवे, चिनेगाव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी तायडे, कामगार नेते दिपक दांडगे, आरपीआयचे विजेंद्र दवंडे, आदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटलांचा भाजपला टोला

सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाची जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे, असा खरमरीत टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या :

‘अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली’, पवारांकडून कौतुक; भाजपवर जोरदार हल्लाबोल

‘ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत एसटी कर्मचारी आस लावून, त्यांच्याकडे लक्ष द्याल का?’

Sudhakar Nikalje from Jalna joined NCP in the presence of Janyat Patil

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.