करेक्ट कार्यक्रम ते कायमचा बंदोबस्त, पूर नियंत्रणासाठी जयंत पाटील येडियुरप्पांच्या भेटीला

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत.

करेक्ट कार्यक्रम ते कायमचा बंदोबस्त, पूर नियंत्रणासाठी जयंत पाटील येडियुरप्पांच्या भेटीला
Jayant Patil meet yediyurappa
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:36 AM

बंगळुरु : पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa) यांची भेट घेतली. अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळेल. (Maharashtra Water Resources Minister Jayant Patil Meeting with Karnataka CM B S Yediyurappa discussing ways to reduce flood Sangli, Kolhapur Krishna river Almatti Dam Water )

त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळुरुत बैठक होत आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित आहेत. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन, महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.

महापुराचं संकट टाळण्याचा उद्देश

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं.

सातारा, सांगली, कोल्हापुरात पुनरावृत्ती नको

सातारा, सांगली, कोल्हापूर भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत. याबाबतीतच मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; ‘या’ विषयावर होणार चर्चा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.