राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची यादी जाहीर करुन पक्ष प्रवेशाचा दावा केला जात आहे, त्यातील पीआरपी आणि रिपाइं आठवले गटातील नगसेवकांनी प्रवेश केला नसल्याचे खुद्द नगरसेवकांनीच स्पष्ट केले आहे

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की
टीम कलानीचा राष्ट्रवादीत प्रवेश

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात टीम ओमी कलानी आणि इतर पक्षातील 22 नगरसेवकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. प्रवेश करणाऱ्या काही नगरसेवकांनी भाजपच्या चिन्हावर महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोटे असल्याचा दावा उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला आहे.

पप्पू कलानींच्या सुनेचा राष्ट्रवादीच प्रवेश

उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.

पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावं यादीत

ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची यादी जाहीर करुन पक्ष प्रवेशाचा दावा केला जात आहे, त्यातील पीआरपी आणि रिपाइं आठवले गटातील नगसेवकांनी प्रवेश केला नसल्याचे खुद्द नगरसेवकांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे यांची नावे प्रवेशाच्या यादीत कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

टीम ओमी कलानीवर नामुष्की

दरम्यान, हे लक्षात येताच यादीत चुकून नावं आली असा खुलासा करण्याची नामुष्की टीम ओमी कलानीच्या प्रवक्त्यांवर आली. तर यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळत नव्हता तो मिळावा म्हणून आकडा वाढवण्यासाठी त्यांनी केलेला हा खटाटोप असल्याची टीका उपमहापौर भगवान भालेराव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ

‘त्यांना जितकं पळायचंय तितकं पळू द्या’, ओमी कलानी यांचं थेट भाजपला आव्हान, उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींना वेग

उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI