VIDEO : मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला आणि खडकावरच अडकला, पुढे जे घडलं तुम्हीच पाहा

| Updated on: Mar 01, 2021 | 10:18 AM

एका पर्यटकाला मासेमारी करणं जीवावर बेतलं आहे. खडकावर बसून मासेमारी करण्याच्या नादात चाऱ्हीही बाजूनी भरतीचे पाणी आलं आणि पुढे जे घडलं ते पाहून सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले.

VIDEO : मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला आणि खडकावरच अडकला, पुढे जे घडलं तुम्हीच पाहा
Follow us on

रत्नागिरी : कोरोनाच्या भीषण काळानंतर आता लोकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. सगळी पर्यटन स्थळं खुली झाल्यामुळे लोकांनी तिथेही गर्दी करण्यास सुरुवात केली. अशात रत्नागिरीमध्ये एक भयंकर प्रकार समोर झाला आहे. एका पर्यटकाला मासेमारी करणं जीवावर बेतलं आहे. खडकावर बसून मासेमारी करण्याच्या नादात चाऱ्हीही बाजूनी भरतीचे पाणी आलं आणि पुढे जे घडलं ते पाहून सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले. (ratnagiri news man got stuck on a rock in sea video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, एक पर्यटक मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला आणि खडकावर उभा होता. अशात चहुबाजूनी भरतीचं पाणी आल्यामुळे तरुण खडकावर अडकला. त्याने दडगावर अडकलेल्या तरुणाने मोबाईलवरून मित्राला फोन करून याची माहिती दिली. मित्राच्या प्रसंगावधानाने त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.

अखेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दगडावर अडकलेल्या तरुणाची सुटका केली. शहरातील भगवती बंदर इथं ही घटना समोर आली असून तरुणाला बाहेर काढतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.

दरम्यान, कोरोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. अशात नागरिकांचे असे स्टंट जीवाला आणखी धोका निर्माण करतात. त्यामुळे आपली काळजी घेत असं कोणतंही कृत्य न करण्याच्या सूचना पोलिसांकडून आणि प्रशानसनाकडून देण्यात आल्या आहेत. (ratnagiri news man got stuck on a rock in sea video viral)

संबंधित बातम्या – 

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही

सेल्फीचा मोह जीवावर, नदीत बोट उलटून पिता-पुत्राचा मृत्यू, मायलेकी बचावल्या

VIDEO | मांस विक्रीवरुन राडा, औरंगाबादेत दोन गटात तुंबळ हाणामारी

पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

(ratnagiri news man got stuck on a rock in sea video viral)