AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. (maharashtra budget session 2021: 25 tested corona positive in mumbai)

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही
विधीमंंडळ अधिवेशन
| Updated on: Mar 01, 2021 | 10:14 AM
Share

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस आणि पत्रकारांचा समावेश आहे. यात एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगण्यात आलं. (maharashtra budget session 2021: 25 tested corona positive in mumbai)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3200 जणांची कोव्हिड-19 ची टेस्ट करण्यात आली होती. यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 23 पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा आदींचा समावेश आहे. बहुतेक आमदारांनी खासगी टेस्ट केल्याने त्यांचा डाटा उपलब्ध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून ही कोरोना चाचणी करण्यात येत होती. काही आमदारांचीही चाचणी झाली होती. मात्र या आमदारांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयके पुढील प्रमाणे:

प्रस्तावित विधेयकांची यादी

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

(1) शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, ( महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलमांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, संयुक्त समितीकडे पाठविण्याचा ठराव संमत दि. 15.12.2020).

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(1) महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020).

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश

(1) महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा विधिग्राह्यीकरण) अध्यादेश, 2021 (महसूल व वन विभाग) (बॅकांशी संबंधित साधे गहाण खत आणि हक्कविलेख-निक्षेप (इक्वीटेबल मॉरगेज), हडप, तारण किंवा तारणगहाण यासंबंधीच्या दस्त तथा संलेख यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतूदीनुसार आकारणी करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता आणण्याकरिता अधिनियमाच्या कलम 5 मध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2015 रोजीच्या भूतलक्षी प्रभावाने तर उक्त अधिनियमात जोडलेल्या अनुसूची-1 मधील अनुच्छेद ६ व अनुच्छेद ४० मध्ये सुधारणा करणेबाबत.)

प्रस्तावित विधेयके

(1) महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021 (महसूल व वन विभाग) (सन २०२१ चा महा. अध्या. क्र. १ ) (बॅकांशी संबंधित साधे गहाण खत आणि हक्कविलेख-निक्षेप (इक्वीटेबल मॉरगेज), हडप, तारण किंवा तारणगहाण यासंबंधीच्या दस्त तथा संलेख यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतूदीनुसार आकारणी करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता आणण्याकरिता अधिनियमाच्या कलम 5 मध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2015 रोजीच्या भूतलक्षी प्रभावाने तर उक्त अधिनियमात जोडलेल्या अनुसूची-1 मधील अनुच्छेद ६ व अनुच्छेद ४० मध्ये सुधारणा करणेबाबत.)

(2) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक, 2021 (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग) (कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत)

(3) महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, 2021 (नगर विकास विभाग) (दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी अस्तिवात असलेली गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत तरतूद करण्याबाबत).

(4) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), विधेयक, 2021 (वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग) (कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवरती २०२१-22 या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन महाविद्यालय, नवीन संस्था सुरू करण्यासाठीची अर्ज करण्याचा दिनांक व नियोजन मंडळाकडून अर्जाची छाननी करून व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने अर्ज शासनाकडे पाठविल्याचा दिनांक निश्चित करण्याची तरतूद करणे.)

प्रस्तावित अध्यादेश

(1) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), अध्यादेश, 2021 (वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग) (कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवरती २०२१-22 या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन महाविद्यालय, नवीन संस्था सुरू करण्यासाठीची अर्ज करण्याचा दिनांक व नियोजन मंडळाकडून अर्जाची छाननी करून व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने अर्ज शासनाकडे पाठविल्याचा दिनांक निश्चित करण्याची तरतूद करणे.)

(2) महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) अध्यादेश, 2021 (नगर विकास विभाग) (दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी अस्तिवात असलेली गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत तरतूद करण्याबाबत). (maharashtra budget session 2021: 25 tested corona positive in mumbai)

संबंधित बातम्या:

LPG Gas latest price : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर

सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, पुण्यात रात्री उशिरापर्यंत तपास, तिघांवर गुन्हा दाखल

VIDEO: आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

(maharashtra budget session 2021: 25 tested corona positive in mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.