मुलांच्या जिवाशी खेळ… एकाच ऑटो-रिक्षात 17 शाळकरी मुलं कोंबली अन्…

मुलांच्या जिवाशी खेळ मांडल्याचं चित्र समोर आलं आहे... एकाच ऑटो - रिक्षात 17 शाळकरी मुलांना कोंबल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे मोठी दुर्घटाना देखील घडू शकते... जाणून घ्या नेमकं काय झालं आहे.

मुलांच्या जिवाशी खेळ... एकाच ऑटो-रिक्षात 17 शाळकरी मुलं कोंबली अन्...
| Updated on: Sep 24, 2026 | 3:42 PM

हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : शिक्षण सर्वांचा मुलभूत हक्क आहे. मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं तरच, त्यांचं  भविष्य घडेल. पण त्याचं मुलांचं जीवन धोक्यात असेल तर? त्या शिक्षणाचा देखील काय  फायदा…  अशात नेमकं काय झालं आहे, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, भिवंडीत  नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे.  शाळकरी मुलांचा धोकादायक प्रवास दिसून आला आहे. प्रवासच असा होणार असेल तर, मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असले.

तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील भिवंडीत 17 शाळकरी मुलांना एका ऑटो – रिक्षात कोंबलं जात असल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. समोर आलेलं चित्र पाहिल्यानंतर मुलांना शाळेत पाठवायचं की, नाही अशा प्रश्न निर्माण होत आहे.

महाराष्ट्रातील भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरातून शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या तीन-प्रवासी ऑटो रिक्षात जवळपास 17 शाळकरी मुलांना कोंबल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडिओमध्ये एकाच ऑटो-रिक्षातून मोठ्या संख्येने शाळकरी मुलांना शाळेत नेलं जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार,  चालकासोबत जवळपास 7 – 8 विद्यार्थी बसलेले. एकमेकांच्या मांडीवर विद्यार्थी बसलेले. एका व्यक्तीने सर्व मुलांना रिक्षातून बाहेर काढल्यानंतर रिक्षाचालक संतापला आणि वाद घालू लागला…

जेथे रिक्षात 2 – 3  प्रवासी बसतात, तेथे त्या रिक्षात 9 – 10 विद्यार्था बसलेले.. जे चुकीचं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सांगायचं झालं तर आजच्या घडीला,  शिक्षण फार महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी तर विद्यार्थी खडतर प्रवास करत शाळेत पोहोचतात. जे भयानक आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us