रोहित आर्याच्या शवविच्छेदनाला विलंब, डॉक्टर हजर पण कुटुंबिय…

पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या रोहित आर्याने मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवले. पोलिसांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढताना रोहित आर्यावर गोळी झाडली. आता रोहित आर्याबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.

रोहित आर्याच्या शवविच्छेदनाला विलंब, डॉक्टर हजर पण कुटुंबिय...
Rohit Arya
| Updated on: Oct 31, 2025 | 1:10 PM

पवई भागात रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. रोहित आर्याचे मुळ नाव रोहित हारोलीकर अस असल्याचे त्याच्या सोसायटीतील लोक सांगत आहेत. पुण्यातील कोथरूड भागातील तो एका सोसायटीमध्ये आई-वडिलांसोबत राहतो. पोलिसांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढताना रोहित आर्यावर गोळी झाडली, त्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणात अजूनही तपास केला जातोय.

शवविच्छेदन करण्यापूर्वी मृत रोहित आर्याच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. के. एस. पाटील पोलिस सर्जन, नागपाडा पोलिस रुग्णालयचे डाॅक्टर जेजे रुग्णालयात दाखल झाले आहेत. शवविच्छेदना दरम्यान कुटुंबियांची उपस्थिती महत्वाची असल्याने विलंब होत असल्याची माहिती मिळतंय. रोहित आर्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. थोड्यावेळात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांची टीम येणार असल्याची माहिती आहे.

तज्ञ डाॅक्टरांचे पथक थोड्याच वेळात जे जे रुग्णालय येथे आल्यानंतर शवविच्छेदन केले जाईल. तीन तज्ञ डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट डॉक्टरच्या मदतीने व्हिडिओग्राफी करून रोहित आर्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. पोलिसांचे पथक जे जे रुग्णालयात दाखल झाले आहे. स्वागृह समोर पोलीस बंदोबस्त आणि रुग्णालय कर्मचारी आले आहेत. रोहित आर्याचे नातेवाईक रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळतंय.

रोहित आर्या याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मुलांना मारण्याची धमकी दिली. मुलांच्या पालकांना त्याने एक मेसेज केला. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, आज शूटिंगला वेळ लागणार आहे, त्यामुळे मुलांना दहा मिनिटं भेटून घ्या. आर्याने हॉलचे दरवाजे बंद करून मुलांना ओलीस ठेवले. काही वेळातच स्वतःचा व्हिडिओ शेअर केला. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर तो सतत फोनवर बोलत असल्याचे सांगितले जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us