नागपुरात आकडे फिरले, मुख्यमंत्र्यांवर ट्विट डिलीट करण्याची वेळ; रोहित पवार म्हणाले, ‘सत्तेचा एवढा इगो….’

नागपुरात रातोरात आकडे फिरल्याने काँग्रेसच्या वंजारी यांचा भाजप उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस एकही जागा जिंकली नाही, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ आली. यावरून रोहित पवारांनी निशाणा साधला.

नागपुरात आकडे फिरले, मुख्यमंत्र्यांवर ट्विट डिलीट करण्याची वेळ; रोहित पवार म्हणाले, सत्तेचा एवढा इगो....
rohit pawar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 9:39 AM

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या कामगिरीपुढे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजप उमेदवाराचा अवघ्या 3271 मतांनी पराभव झाला. संघाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चारली. खरंतर देशभरात संध्याकाळपर्यंत काँग्रेसने एकही जागा जिंकली नव्हती. त्यावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला डिवचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निकालावरून काँग्रेसला टोमणा मारला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसला डिवचलं होतं. परंतु काँग्रेसने संघाच्या बालेकिल्ल्यात रात्री एक जागा जिंकली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ आली. यावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी   

Loading...

आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की, आदरणीय देवेंद्र फडणवीस, आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे……आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल…विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांचे अभिनंदन, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधरांचे आभार, लढणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील शुभेच्छा’.

 

काँग्रेसची पोस्ट जशीच्या तशी 

महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं, ‘ट्विट डिलीट करून फडणवीसांनी पुन्हा एकदा सावरकरांचा वारसा जपला!संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात फडणवीसांनी ट्विट केलं. पण तोच तीर उलटला आणि थेट त्यांच्या छातीत घुसला! अखेर नामुष्की ओढवून घेत ट्विट डिलीट करण्याची वेळ आली. फडणवीसजी, एवढ्यातच घाबरलात? हा तर फक्त ट्रेलर आहे! २०२९ मध्ये महाराष्ट्राची जनता तुमचा असा काही राजकीय कंडका पाडेल की, आजचं हे ट्विटही तुम्हाला आठवेल! All the best, फडणवीसजी! पुढच्या झटक्यासाठी तयार राहा’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us