Satara Accident : वारकऱ्यांच्या गाडीला अपघात! 30 वारकरी जखमी, एकाचा मृत्यू, शिरवळजवळ ट्रकची वारकऱ्यांच्या वाहनाला जोरदार धडक

| Updated on: Jun 19, 2022 | 11:58 AM

Warkari Accident : या अपघातात 30 वारकरी गंभीर जखमी झाले असून 11 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर यात एका वारकऱ्यांचा मृत्यू (Varkari Died) झाला

Satara Accident : वारकऱ्यांच्या गाडीला अपघात! 30 वारकरी जखमी, एकाचा मृत्यू, शिरवळजवळ ट्रकची वारकऱ्यांच्या वाहनाला जोरदार धडक
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी आळंदीला वारीसाठी जात असताना साताऱ्यातील (Satara Accident News) शिरवळ नजीक भीषण (Shirwal Accident) अपघात झाला. वारकर्यांच्या ट्रॉलीला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ट्रॉलीमध्ये एकूण 43 वारकरी होते. या अपघातात 30 वारकरी गंभीर जखमी झाले असून 11 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर यात एका वारकऱ्यांचा मृत्यू (Varkari Died) झाला असून एक वारकरी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आयशर टेम्पो पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोने विद्युत पोलला धडक दिली. त्यानंतर ट्रॉलीमधून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना या टेम्पोने धडक दिली. सर्व वारकरी झोपेत असताना ही भीषण अपघात घडला. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ.जोगळेकर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने वारकरी संप्रदायाला धक्का बसलाय.

पहाटे 3 वाजण्याच्या

वारकऱ्यांना घेऊन एक ट्रॅक्टर निघाला होता. ट्रॅक्टरला मागे ट्रॉली लावण्यात आली होती. त्यात वारकरी बसले होते. दरम्यान, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी थेट रस्त्यावर फेकले गेले. यात वारकऱ्यांच्या हातापायाला गंभीर इजा झाली. तर एका वारकऱ्याला जबर मार बसून त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

30 जण थोडक्यात बचवाले

पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराही ही दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरचे एक रहिवासी मारुती कोळी नावाची व्यक्ती जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. इतर जखमींची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत. आळंदीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी आळंदीला जायला हे वारकरी निघाले होते. मात्र वाटेतच काळानं एका वारकऱ्यांवर घाला घातलाय. तर थोडक्यात अन्य वारकरी बालंबाल बचावले आहेत. सध्या जखमी वारकऱ्यांवर उपचार केले जात आहेत.

सीसीटीव्ही फुटजही समोर

दरम्यान, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघातात ट्रक ट्रॅक्टरला मागच्या बाजूने धडक देताना दिसून आलाय. अपघातानंतर शिरवळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केलंय.