Hawaman Andaj | पाहा काय म्हणतोय हवामानाचा अंदाज, मान्सून परतणार की पुन्हा धो-धो?

| Updated on: Oct 12, 2022 | 9:53 AM

देशात राज्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Hawaman Andaj | पाहा काय म्हणतोय हवामानाचा अंदाज, मान्सून परतणार की पुन्हा धो-धो?
पुन्हा पावसाची शक्यता
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

देशात मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Heavy rain) पडत आहे, त्यामुळे काडणीला आलेल्या पीकांचं मोठं नुकसान होत असल्याचं शेतकरी (Farmer) विविध माध्यमातून सांगत आहेत. कारण मागच्या दोन दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. येत्या चार दिवसात सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतीची कामे करीत असताना काळजी घ्या असा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं जोर धरलाय, मध्य भारतातून मान्सून परतण्यास पोषक वातावरण तयार होतं आहे. आज उत्तर मध्य महाराष्ट्र पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात वीज मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कर्नाटक मराठवाडा विदर्भ नैऋत्य मध्य प्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्रसपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्रकार वारं वाहत आहे. त्यामुळे पोषक हवामानामुळे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मॉन्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतला, चार ते पाच दिवसांमध्ये मध्य भारताच्या काही भागातून मान्सून काढता पाय घेण्याचे संकेत आहेत.

देशात राज्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.