काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचं निधन
मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचं निधन झालं आहे. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचं निधन झालं आहे. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भानुदास कोतकर हे माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील आहेत. तसेच ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. अहिल्यानगर जिल्ह्यच्या राजकारणामध्ये ते चांगलेच सक्रिय होते. त्यांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद, शहर जिल्हाध्यक्ष पदासह पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि मुंबई बाजार समितीचे संचालक अशा विविध पदांवर काम केलं. भानुदास कोतकर यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भानुदास कोतकर यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. भानुदास कोतकर यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भुषवली. ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते, त्याचसोबत पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि मुंबई बाजार समितीचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.