Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानच्या सर्व विश्वस्तांची निवड पूर्ण, कोणत्या पक्षाचे किती विश्वस्त? वाचा

| Updated on: Jun 01, 2022 | 10:43 PM

अगोदरच्या‌ 12 विश्वस्तांना धोरणात्मक अधिकार घेण्याचा अधिकार नव्हता, मात्र आता सर्व विश्वस्तांची निवड झाल्याने शिर्डीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. ही याचिका गेल्या अनेक दिवसांपासून हायकोर्टात होती.

Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानच्या सर्व विश्वस्तांची निवड पूर्ण, कोणत्या पक्षाचे किती विश्वस्त? वाचा
शिर्डी साईबाबा संस्थानच्या सर्व विश्वस्तांची निवड पूर्ण
Image Credit source: tv9
Follow us on

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबाच्या (Shirdi Saibaba) दर्शनाला जगभरातून लोक दाखल होता. महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानापैकी एक म्हणून या धार्मिक स्थळाकडे (Religious place) पाहिलं जातं. आज शिर्डी साईबाबा संस्थानाच्या उर्वरीत विश्वस्तांची निवड प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. अगोदरचे 11 विश्वस्त आहेत आणि आत्ता 6 जणांची निवड करण्यात आली आहे.  तर शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष (Mayor) पदसिद्ध असणार आहे. त्यामुळे आता या संस्थानाचे एकूण 18 विश्वस्त असणार आहेत. अगोदरच्या‌ 12 विश्वस्तांना धोरणात्मक अधिकार घेण्याचा अधिकार नव्हता, मात्र आता सर्व विश्वस्तांची निवड झाल्याने शिर्डीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. ही याचिका गेल्या अनेक दिवसांपासून हायकोर्टात होती. विश्वस्तांच्या नेमणुकीबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला तसे आदेश दिले होते. ते आदेश लक्षात घेऊन आता विश्वस्तांची निवड पूर्ण करण्यात आली आहे.

कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

आता नवीन ज्या सहा विश्वस्तांची निवड झाली आहे. त्यात तिन्ही पक्षांचे विश्वस्त आहेत. नुतन विश्वस्तांमध्ये तीन शिवसेना , दोन कॉग्रेस तर एक राष्ट्रवादीच्या कोट्यातील विश्वस्त निवडण्यात आले आहेत.

नव्या सहा विश्वस्तांची यादी

  1. मिना कांबळी – शिवसेना
  2. सचिन कोते – शिवसेना
  3. हे सुद्धा वाचा
  4. डॉ.जालिंदर भोर – शिवसेना
  5. सुनिल शेळके – राष्ट्रवादी
  6. सुभाष लाखे – कॉग्रेस
  7. दतात्रय‌ सावंत – कॉग्रेस

धोरणात्मक निर्णय घेण्याचा वाद मिटणार?

आधीच्या विश्वास्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा नव्हती त्यामुळे यावरून अनेकदा वाद झाले आहेत. मात्र आता यावेळी प्रथमच नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह एकूण 5 विश्वस्त शिर्डीचे असणार आहेत. त्यामुळे आता तरी हा तिढा सुटेल आणि पुढील सर्व प्रक्रिया ही व्यवस्थित पार पडले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शिर्डीत नेहमीच भाविकांची गर्दी

शिर्डी आणि पंढरपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी धार्मिक स्थळ मानली जातात. वर्षातील बारा महिने याठिकाणी भक्तांची रिघ असते. त्यामुळे या भक्तांच्या सोयीसाठी मंदिर समिती आणि विश्वस्त मंडळाला अनेक गोष्टींचं नियोजन करावे लागते. योग्य नियोजन न झाल्यास अनेकदा भक्तांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या नियोजन प्रक्रियेत आणि निर्णय प्रक्रियेत विश्वस्त मंडळ ही अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असते. त्यासाठी विश्वास्त मंडळ आणि मंदिर समितीचा कारभार तेवढाच पारदर्शक आणि चोख असणे गरजेचे असते. आता विश्वस्तांची निवड पूर्ण करून मंदिर प्रशासन अधिक भक्कम होणार आहे. त्यामुळे भक्तांसाठीही ही मोठी जमेची बाजू असणार आहे.