Sanjay Raut Video : आता नेहरुंच्या समाधीवरही ईडीची नोटीस ठेवतील, भाजपविरोधात गरजलेच पण काँग्रेसवरही संजय राऊत बरसले

राष्ट्रीय एकात्मतेवर, धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पर्याय टिकत नाहीत. आता मला वाटतंय की पंतप्रधान पदही लोकपालाच्या कक्षेत यायला हवं, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाना साधला आहे. मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

Sanjay Raut Video : आता नेहरुंच्या समाधीवरही ईडीची नोटीस ठेवतील, भाजपविरोधात गरजलेच पण काँग्रेसवरही संजय राऊत बरसले
शिवसेनेची मुलखमैदानी तोफ उद्या अयोध्येत, युवराजांच्या दौऱ्याआधी संजय राऊत करणार पाहणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:13 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे रोज चर्चेत असतात. मुद्दा कुठलाही असो राऊतांचं टार्गेट हे ठरलेलं असतं. आज संजय राऊत यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीची नोटीस आल्यावरून भाजपवर हल्लाबोल चढवलाच, मात्र त्यांनी यावेळी काँग्रेसलाही जोरदार टोलेबाजी केली आहे. संजय राऊत यांची महाविकास आघाडीत काँग्रेस सामील झाल्यापासून टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यावेली त्याला कारण ठरलंय राज्यसभा निवडणूक आणि इम्रान पतापगडी यांची उमेदवारी. आज काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान तुमच्यापेक्षा आमच्यावर आलंय. पर्याय येतात आणि जातात. मात्र राष्ट्रीय एकात्मतेवर, धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पर्याय टिकत नाहीत. आता मला वाटतंय की पंतप्रधान पदही लोकपालाच्या कक्षेत यायला हवं, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाना साधला आहे. मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

स्मारकावर ईडीची नोटीस ठेवतील

नेहरुंच्या समाधीवर नोटीस टेकवणं बाकी

तसेच ईडीच्या कारवाईवरून हल्लाबोल चढवताना संजय राऊत म्हणाले, आमच्यापासून ते आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचलेत. नॅशनल हेरॉल्ड नेहरूनी उभे केलंय.त्यावरही हल्ले सुरू आहेत. आता ते पंडित नेहरूंच्या स्मारकावरही ईडीची नोटीस ठेवतील. केवळ नेहरूंच्या समाधीवर ईडीची नोटीस चिकटवणं बाकी आहे, असे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलं आहे. तसेच हेही दिवस बदलतील, असे म्हणत त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्यापासून देशभरातून यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप पक्षाच्या शाखेप्रमाणे ईडीची वापर करत आहे, अशी टीका आता काँग्रेसकडून होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसलाही टोलेबाजी

यावेळी बोलताना संजय राऊत संजय राऊत मुणगेकर यांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला परत खासदारकी मिळाली नाही. कारण तुम्हाला शायरी येत नाही, तुम्ही कोकणातले आहात. प्रतापगडाचे नाहीत, असे म्हणत त्यांनी या उमेदवारीवरून टोला लगावला. तसेच मी निरोप समारंभात कधी गेलो नाही म्हणून मी वारंवार खासदार झालो. तुमच्याकडं मोठी प्रोसेस असते. बायोडाटा वरपर्यंत जातो.कधी कधी जातही नाही. मॅडमने मान हलवल्याचे सांगितले जाते, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्ष हा फक्त सोनिया गांधी यांच्या आदेशावरून चालतो अशी टीका काँग्रेसवर वेळोवेळी होत आली आहे. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी ही टोलेबाजी केली आहे. तसेच राज्यातले काँग्रेस नेतेही इम्रान प्रतापगडी यांच्याा उमेदवारीवरून नाराज आहे.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.