Sourav Ganguly : शहांसोबतच्या डिनर डिप्लोमसीनंतर महिन्याभरातच बीसीसीआयचा राजीनामा; सौरव गांगुली राज्यसभेवर जाणार?

Sourav Ganguly : 6 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांच्या घरी रात्रीचं जेवण केलं होतं. यावेळी सौरव गांगुली, त्यांची पत्नी डोना गांगुली आणि शहा यांच्यात राजकीय चर्चा झाली.

Sourav Ganguly : शहांसोबतच्या डिनर डिप्लोमसीनंतर महिन्याभरातच बीसीसीआयचा राजीनामा; सौरव गांगुली राज्यसभेवर जाणार?
सौरव गांगुली राज्यसभेवर जाणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:36 PM

नवी दिल्ली: सौरव गांगुली (Saurav Ganguly) आज राजकारणात येणार उद्या राजकारणात येणार अशी गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती. मात्र, सौरव गांगुली यांनी आपण राजकारणात येणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मधल्या काळात सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यामुळे सौरव गांगुली आता राजकारणात येणार नाही, असंच वाटत होतं. मात्र, आज अचानक सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या (bcci) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बरं केवळ राजीनामा देऊन सौरव गांगुली थांबले नाहीत, तर त्यांनी मी नवीन योजना आखत असल्याचं सांगून राजकारणात येण्याचे संकेतही दिले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे नेते अमित शहा (Amit Shah) यांच्या मुलासाठी सौरव यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं का? की भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं का? एकीकडे भाजपचे पश्चिम बंगालमधील विद्यमान खासदार आणि आमदार पदांचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये येत असताना सौरव गांगुली खरोखरोच भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चाही रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

6 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांच्या घरी रात्रीचं जेवण केलं होतं. यावेळी सौरव गांगुली, त्यांची पत्नी डोना गांगुली आणि शहा यांच्यात राजकीय चर्चा झाली. सौरव गांगुली किंवा डोना गांगुली यांनी राज्यसभेवर जाण्याबाबत ही चर्चा होती. पश्चिम बंगालमधून रुपा गांगुली आणि स्वपन दासगुप्ता हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर गेले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने सौरव किंवा डोना यांच्यापैकी एकाने राज्यसभेवर जावं असं शहा यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सौरव गांगुली किंवा डोना गांगुली राज्यसभेवर जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. सौरव गांगुली यांनी या चर्चेचं खंडन केलं नव्हतं. त्यामुळे या चर्चेंना अधिकच बळ मिळालं होतं. त्यातच आता सौरव यांनी बीसीसीआयचा राजीनामा देऊन नव्या योजनेबाबत सूतोवाच केल्याने सौरव गांगुली राज्यसभेवर जाणार हे निश्चित मानलं जात आहे.

सौरवदाचे तळ्यात मळ्यात

सौरव गांगुली यांनी राजकारणात जाणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. सर्वच राजकीय पक्षात आपले मित्रं असल्याने कुणालाही दुखवू इच्छित नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत राजकारणात प्रवेश केला नव्हता. सौरव गांगुली राजकारणात आले तर चांगलं काम करतील. कारण ते जेही काम करतात ते चांगलंच करतात, असं डोना गांगुली यांनी डिनर डिप्लोमसी देऊन चर्चांना हवा दिली होती. त्यातच आता सौरव यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडल्याने या चर्चांना अधिक बळकटी आली आहे.

12 सदस्य निवृत्त होणार

राष्ट्रपतींकडून 12 सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती होणार आहे. साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवेशी निगडीत क्षेत्रातील लोकांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती केली जाते. त्यामुळे या यादीत सौरव गांगुली यांच्या नावाचा समावेश होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मिथुन चालले नाहीत, सौरव तरी चालतील

पश्चिम बंगालमध्ये अभिनेता मिथुन चक्रवती यांची मोठी क्रेझ होती. त्यामुळे आपल्या क्रेझमुळे मिथुन चक्रवर्ती राजकीय फायदा मिळवून देतील असं भाजपला वाटत होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने मिथुन चक्रवर्तींना स्टारप्रचारक म्हणून उतरवलं होतं. पण ममतादीदींच्या झंझावातापुढे मिथुन चक्रवर्ती फेल ठरले. मिथुनदाची जादू चालली नाही. त्यामुळे भाजपला एक मोठा चेहरा हवा आहे. त्यातच भाजपचे विद्यमान खासदार आणि आमदार पक्ष सोडून जात असल्याने भाजपने सौरव गांगुलींना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सौरव गांगुली हे एक मोठं नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यामुळेच भाजपचा ओढा सौरव यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.