tv9 Marathi Explainer : मुंबईत गेल्या दोन महिन्यातले सर्वाधिक कोरोना रुग्ण, पॉजिटीव्ह रेट 6 टक्क्यांवर, मास्क वापरताय ना?

मुंबईत कोरोनाचे 711 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण प्रकरणे 7 कोटी 88 लाख 7 हजारांवर गेली आहेत. सक्रिय प्रकरणे 3,475 आहेत. तर त्यातून 366 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

tv9 Marathi Explainer : मुंबईत गेल्या दोन महिन्यातले सर्वाधिक कोरोना रुग्ण, पॉजिटीव्ह रेट 6 टक्क्यांवर, मास्क वापरताय ना?
कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संख्येतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 9:58 PM

मुंबई : कोरोनाने (Corona) देशाची चाके थांबवली होती. त्यानंतर दोन एक वर्ष सगळं थांबून होतं. मात्र आता सगळे निर्बंध हटवले गेले आहेत. देशाच्या विकासाची चाके रुळावर धावू लागली आहेत. असे आशा दायक चित्र देशाच्या समोर असताना आता चिंतेचे मळभ देशावर पसरत आहे. देशाच्या विविध भागात पुन्हा कोरोनाचे रूग्ण सापडत आहे. फक्त सापडत नाहीत तर पॉझिटीव्ह रेट (positive rate) झपाट्आने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यातील अरोग्य व्यवस्थेसमोर कोरोनामुळे पुन्हा टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाल्यास राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 506 नवीन रुग्ण आढळले आहेत. जी या वर्षी 6 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील चाचणी दरम्यान पॉझिटीव्हिटी रेट 6% वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मुंबईत मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

देशात 2,745 नवीन प्रकरणे

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,745 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ही 4 कोटी 31 लाख 60 हजारांच्या पुढे गेली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 800 झाली आहे. तेथे गेल्या 24 तासांत 2,236 कोरोना बरे झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 600 वर पोहोचला आहे. सध्या, संसर्ग दर हा 0.04% आहे, तर कोरोनाचा पुनर्प्राप्तीचा दर हा 98.74% आहे.

मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितले की, आम्ही अधिकाऱ्यांना ‘युद्धपातळीवर’ चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. तर कोरोना टेस्ट करणाऱ्या प्रयोगशाळानांही पूर्णत: तयार राहण्यास आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यास सांगितलं आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत असून, आता पावसाळा तोंडावर आल्याने कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. बीएमसीने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम आणि बूस्टर डोस देण्यावर ही भर देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे

मुंबईत कोरोनाचे 711 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण प्रकरणे 7 कोटी 88 लाख 7 हजारांवर गेली आहेत. सक्रिय प्रकरणे 3,475 आहेत. तर त्यातून 366 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा आता 1 लाख 47 हजार 860 वर पोहोचला आहे.

मास्क वापरणं, लस घेणं अपरिहार्य

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांची आढवा बैठक घेतली होती. तसेच कोरोनामुळे आधीच राज्याचे अतोनात नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. तसेच कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणं, लस घेणं अपरिहार्य आहे असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. त्याचबरोबर राज्यात रुग्णांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणं आढळल्यास तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

काय म्हणाले होते राजेश टोपे?

मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत जरी असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असा दावा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. पावसाळ्यात डायरियासारखे आजार होण्याची भीती जास्त असते म्हणून ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागातल्या लोकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केल्या. पावसाळयात ज्या ठिकाणी दुषित पाणी येते त्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे साथीचे रोग आणि इतर आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उखळून पिणे गरजेचे आहे असेही मत त्यांनी यावेळी मांडले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले की, आज जी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे ती मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या एक दोन जिल्ह्यातच दिसून येत आहे.

शासनस्तरावर आम्ही काळजी घेत आहोत

या परिसरात रुग्णसंख्या वाढत असली तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची माहिती देताना राजेश टोपे यांनी मंकीपॉक्सबद्दलही हा रोग आला असला तरी मुंबई, पुणे आणि ठाणे परिरसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असंही त्यांनी सांगितले. हा रोग आपल्याकडे आला नसून आणि तो येऊ नये यासाठी शासनस्तरावर आम्ही काळजी घेत आहोत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

दिल्लीचा सकारात्मकता दर 2.15

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिल्लीत 373 नवीन प्रकरणे आणि एका मृत्यूची नोंद झाली. तर 255 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीचा सकारात्मकता दर हा 2.15% आहे. दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या 17,371 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थान

मध्य प्रदेशात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 42 हजार 500 च्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे कोरोना मुळे मृतांचा आकडा 10,736 वर स्थिर राहिला आहे. राज्यात कोरोनाच्या 4,834 चाचण्या झाल्या. त्याच वेळी, राजस्थानमध्ये 57 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकही मृत्यू झालेला नाही. राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 532 वर पोहोचली आहे आणि एकूण रुग्णांची संख्या 12 लाख 85 हजार 700 च्या पुढे गेली आहे. बुधवारी राज्यात 6478 चाचण्या करण्यात आल्या होत्या.

बेंगळुरूमध्ये 178 नवे बाधित

मंगळवारी कर्नाटकमध्ये 197 कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर एका मृत्यूसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 40,065 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 39 लाख 52 हजार झाली आहे. नवीन प्रकरणांपैकी 178 प्रकरणे एकट्या बेंगळुरू शहरात नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 लाख 10 हजारांच्या जवळपास असताना मंगळवारी 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र सक्रिय रुग्णांची संख्या 2,029 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 17,716 चाचण्या करण्यात आल्या.

चीनमध्ये 100 पेक्षा कमी नवीन प्रकरणे

सुमारे 25 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये बुधवारपासून कोरोनावरील आणखी निर्बंध कमी करण्यात येणार आहेत. सुमारे दोन महिन्यांनंतर बस आणि रेल्वे सेवा सुरू होईल. शांघायचे उपमहापौर जोंग मिंग म्हणाले की, महामारी आता नियंत्रणात आहे. तर 75% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळाही उघडल्या जातील. मॉल्स आणि मार्केटमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दुसरीकडे, चीनमध्ये तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच 100 हून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, हाँगकाँग विद्यापीठाचे प्रा. निकोलस थॉमस यांच्या मते, कम्युनिस्ट पक्षाच्या आगामी अधिवेशनात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग याला कोरोनावरील विजय म्हणून सादर करतील. राजधानी बीजिंगमध्ये बुधवारपासून काही कार्यालये आणि शॉपिंग सेंटर्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, बीजिंगमध्ये शाळा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सध्या बंद राहतील. चीन सरकारने प्रमुख शहरांमध्ये आठवड्यातून एकदा लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

हज यात्रेकरूंसाठी लसीकरण

हज यात्रेकरूंना कोरोना संसर्गापासून वाचविण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिम जोरात सुरू करण्यात आली आहे. यावर्षी खोऱ्यातून सुमारे 5,281 लोक हजला जाणार आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांना मोफत लस दिली जात आहे. यापूर्वी, हज हाऊस श्रीनगरच्या अधिकाऱ्यांनी 21 मे रोजी काश्मीर खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणही घेतले होते. कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक होण्यापूर्वी, दरवर्षी सुमारे 2.5 दशलक्ष लोक हजसाठी सौदी अरेबियात जात होते.

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.