सावधान, महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, राज्यात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद, 225 कोरोनाबाधितांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

सावधान, महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, राज्यात 'इतक्या' रुग्णांची नोंद, 225 कोरोनाबाधितांचा मृत्यू
corona virus
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 9:07 PM

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात 6959 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यात आज 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

रुग्णवाढ कायम

केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केल जातेय.महाराष्ट्रातही काही जिल्हे अ‌ॅलर्ट झाले असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज 6959 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 225 जणांचा मृत्यू झाल्यानं राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे.

7467 जण कोरोनामुक्त

महाराष्ट्रात आज 7467 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 60, 90, 786 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.62 टक्के झालं आहे.

राज्यात आजपर्यंत 76 हजार 755 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 63 लाख 3 हजार 715 झाली आहे.आरोग्य विभागाच्या ठाणे मंडळात 982 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई मनपामध्ये 345 रुग्ण आढळले. तर, नाशिक मंडळात 1130 रुग्ण आढळले इथ सर्वाधिक रुग्ण अहमदनगरमध्ये 965 रुग्ण आढळले आहेत. पुणे मंडळात 2386 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण सातारा जिल्ह्यात 798 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर मंडळात 1863 तर सांगलीत 674 रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद मंडळात 102 तर लातूर मंडळात 412 रुग्ण आढळले आहेत. अकोला मंडळात 32 तर नागपूर मंडळात 52 रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये कोरोनाचा स्फोट

केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या 20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

देशाची संख्या चाळीस हजारावर

गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडतायत. गेल्या चोवीस तासात 41 हजार 649 एवढे नवे रुग्ण सापडलेत. शुक्रवारी हाच आकडा 44 हजार 230 एवढा होता. दिलासादायक म्हणजे अजूनही रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यापेक्षा जास्त आहे. गेल्या चोवीस तासात 37 हजार 291 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत.

इतर बातम्या:

सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये स्फोट, महाराष्ट्रातही आकडा वाढतोय, वाचा सविस्तर

Maharashtra News LIVE Update | पुणेकरांना निर्बंधातून दिलासा नाहीच, शहरात नियम जैसे थेच राहणार

Maharashtra Corona Update corona virus patients increased in state 6959 people tested positive fear of third wave

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.