Maharashtra News LIVE Update | पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात पाईपलाईनला आग, दोन जण जखमी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात पाईपलाईनला आग, दोन जण जखमी
ब्रेकिंग न्यूज

| Edited By: prajwal dhage

Aug 01, 2021 | 12:02 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Jul 2021 09:42 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 260 कोरोना रुग्णांची वाढ 

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 260 कोरोना रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 335 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधित 14 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 8

  – 220 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 487165

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2496

  – एकूण मृत्यू -8767

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 475902

 • 31 Jul 2021 08:01 PM (IST)

  अहमदनगरमध्ये आज 1050 नव्या बाधितांची नोंद

  अहमदनगर कोरोना अपडेट

  आज नव्या 1050 बाधितांची नोंद

  तर 1388 रूग्णांना डिस्चार्ज

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के

  बरे झालेली रुग्ण संख्या: 287696

  उपचार सुरू असलेले रूग्ण:5619

  पोर्टलवरील मृत्यू नोंद: 6195

  एकूण रूग्ण संख्या : 299210

 • 31 Jul 2021 07:02 PM (IST)

  कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण बंद

  ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात लस उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील

 • 31 Jul 2021 07:01 PM (IST)

  चिपळूणच्या वाशिष्टीपुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु, एकावेळी एकच अवजड वाहन सोड़णार

  चिपळूण- मुंबई गोवा महामार्गावरून चिपळूणच्या वाशिष्टीपुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु

  सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रित

  एकावेळी एकच अवजड वाहन सोड़णार

  संध्याकाळी 6 नंतर पहाटे 6 वाजेपर्यंत बंदी

  इतर वाहने पुलावरून 24 तास सुरु

 • 31 Jul 2021 06:04 PM (IST)

  पुणेकरांना निर्बंधातून दिलासा नाहीच, शहरात नियम जैसे थेच राहणार

  पुणे - पुणेकरांना निर्बंधातून दिलासा नाहीच...

  - पुणे शहरात नियम जैसे थेच राहणार,

  - पुढील आदेश येईपर्यंत नियमांत सूट नाही...

  - पुणे शहरातील व्यवहार चार वाजताच होणार बंद...

  - महापालिका आयुक्तांनी जारी केलेत आदेश.

 • 31 Jul 2021 05:51 PM (IST)

  पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात पाईप लाईनला आग, दोन जण जखमी

  पिंपरी चिंचवड- पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात MNGL पाईप लाईनला अचानक लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाल्याची घटना घडलीय

  -महेंद्र बानवलीकर वय 52, स्मिता बानवलीकर वय 50 अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  -पिंपरीतील रामकृष्ण चौक शेजारी असलेल्या पेरूच्या बागेलगत ही घटना घडली

  -प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार पावसाळी कामासाठी रस्ते खोदणाऱ्या करणाऱ्या JCB चा धक्का लागून MNGL ची पाईप लाईन फुटल्यामुळे त्यातून गॅस लिक झाला आणि अचानक आग लागली

  -ह्या वेळी दुचाकीस्वार आपल्या वाहनावरून जात असताना त्यावेळी ही गॅस पाइपलाइन लिकेज झाली आणि हे दोघेही गाडी सोबत भाजले तर या आगीत दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे

 • 31 Jul 2021 05:22 PM (IST)

  बनावट एटीएम कार्ड वापरून पैशांची लूट करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक 

  मुंबई : एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या इसमाला मुंबई पोलिसांनी केली अटक

  अटक करण्यात असलेल्या अरोपीचे नावं नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनट वय 38 असून तो रोमेनियन नागरिक आहे

  पोलिसांना त्याच्या कडून 3 लॅपटॉप, 166 एटीएम कार्ड, कार्डर स्वॅपिंग रीडर डीव्हाईस, 2 नोट मोजनारी मशीन, 4 मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहेत

  या आधी सुद्धा त्याच्यावर मुंबई मध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत

 • 31 Jul 2021 04:56 PM (IST)

  शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय

  मुंबई : शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय

  आशिष शेलार, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत होणार कार्यालयाचे उद्घाटन

  माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन

  बाईक रॅली काढून चार ठिकाणी केले जाणार ध्वजारोहण

 • 31 Jul 2021 03:59 PM (IST)

  सरकारने घेतलेला 15 टक्के फी माफीला ‘मेस्टा’चा विरोध

  मुंबई : सरकारने घेतलेला 15 टक्के फी माफीला ‘मेस्टा’चा विरोध

  - महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशने केला विरोध

  - खासगी शाळांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही

  - राज्य सरकारने मतांच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप

  - नागपुरात पत्रकार परिषद घेऊन केला फी माफीचा विरोध

  - राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

  - दोन वर्षांपासून शाळा आर्थिक संकटात, शिक्षणमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय

 • 31 Jul 2021 03:57 PM (IST)

  कोरोना निर्बंधांच्या विरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक 

  पुणे - कोरोना निर्बंधांच्या विरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक

  - सोमवारपर्यंत निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली नाही तर मंगळवारपासून दुकानं खुली करण्याचा इशारा

  - दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी

  - सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरणार

 • 31 Jul 2021 03:56 PM (IST)

  नाशिकमध्ये गोविंदनगरात गुलमोहराची 3 झाडे कोसळली

  नाशिक - शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली

  चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान

  बुंधा भुसभुशीत झाल्यानं झाडे  कोसळल्याची प्राथमिक  माहिती

 • 31 Jul 2021 01:17 PM (IST)

  औरंगाबाद खंडपीठात सोमवारपासून होणार प्रत्यक्ष सुनावणी

  औरंगाबाद -

  औरंगाबाद खंडपीठात सोमवारपासून होणार प्रत्यक्ष सुनावणी

  कोरोनामुळे फक्त तातडीच्या खटल्यांची ऑनलाईन सुरू होती सुनावणी..

  2 ऑगस्ट पासून होणार साडे दहा ते साडे चार वाजेपर्यंत सुनावणी..

  5 सप्टेंबर पर्यंत खंडपीठाच्या न्यायमूर्तींचे सुनावणी संदर्भातील वेळापत्रक निश्चित..

  कोरोनाचं संकट कमी होत असल्याने मोठा निर्णय..

 • 31 Jul 2021 01:17 PM (IST)

  नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो - मुख्यमंत्री

  मुख्यमंत्री -

  - मुंबई - पुणे युतीच्या सरकारमध्ये झालेल्या एक्सप्रेस हायवेची आठवण

  - नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक

  - नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो

  - समुद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आपण लवकर सुरु करतोय

  - रस्ते खचतायत, गडकरी साहेब राज्याला आपली मदत लागणार आहे

  - गडकरींकडच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचं हित सांभाळात काम करायचं आहे

  - कितीही पाऊस पडला तरिही बाधा येणार नाही, असं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे

 • 31 Jul 2021 01:15 PM (IST)

  मिरजमध्ये चालत्या स्कुटी गाडीने अचानक घेतला पेट

  सांगली -

  मिरजमध्ये चालत्या स्कुटी गाडीने अचानक घेतला पेट

  शॉर्टसर्किट झाल्याने गाडीनं घेतला पेट

  गाडीवरील दोघांनी गाडी सोडून दिल्याने पुढील अनर्थ टळला

 • 31 Jul 2021 12:40 PM (IST)

  भाई गणपतराव देशमुख यांना निवासस्थाजवळ पोलीस मानवंदना दिली 

  सांगोला -

  भाई गणपतराव देशमुख यांना निवासस्थाजवळ पोलीस मानवंदना दिली

  निवासस्थानावरून अंत्ययात्रेला सुरवात

 • 31 Jul 2021 12:04 PM (IST)

  नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमीपूजन

  - नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमीपूजन

  - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार भुमीपुजन

  - मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि अशोक चव्हाण व्हीडीओ लिंकद्वारे लावणार हजेरी

  - कडबी चौक ते गोळीबार चौक ४.८२ किमीचा नविन उड्डाणपुला

  - प्रकल्पाची किंमत १४६ कोटी रुपये

  - नागपूर ते नागभीड रेल्वेवरील चार नविन उडाणपुलाचं होणार भुमिपुजन

 • 31 Jul 2021 11:42 AM (IST)

  भाई गणपतराव देशमुख यांच पार्थिव थोड्याच वेळात त्याच्या निवासस्थानी येत आहे

  सांगोला

  भाई गणपतराव देशमुख यांच पार्थिव थोड्याच वेळात त्याच्या निवासस्थानी येत आहे

  रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार्यकर्ते नागरिकांची गर्दी

 • 31 Jul 2021 11:25 AM (IST)

  पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या आढावा बैठकीला सुरुवात

  - पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या आढावा बैठकीला सुरुवात

  - बैठकीत शरद त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानावरून सुरु ऑनलाइन सहभागी,

  - सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात,

  - बैठकीत रयत शिक्षण संस्थेचे इतर पदाधिकारीही सहभागी

 • 31 Jul 2021 11:09 AM (IST)

  रायगड जिल्ह्यात साधारण 800 कोटी रुपयांचं नुकसान

  रायगड

  रायगड जिल्ह्यात साधारण 800 कोटी रुपयांच नुकसान,

  गेल्या दोन वर्षात रायगडवासियांना विविध संकटांना सामोरं जावं लागलंय,

  रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत करा , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार मागणी,

  रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय, पंचनामे करून मदत लवकरात लवकर द्या रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची मागणी,

  रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य गावांच स्थलांतर 8 महिन्यात करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी,

  रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार,

  तळीये ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन पुनर्वसन करणार

 • 31 Jul 2021 10:33 AM (IST)

  गणपतराव देशमुख यांचे पार्थिव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दर्शनासाठी ठेवण्यात आले

  गणपतराव देशमुख यांचे पार्थिव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दर्शनासाठी ठेवण्यात आले,

  नातू डॉ.बाबासाहेब आणि डॉ .अनिकेत रथावर

  "अमर रहे अमर रहे, भाई गणपतराव देशमुख अमर रहे"च्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

  अखेरचा निरोप घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

 • 31 Jul 2021 10:13 AM (IST)

  खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शनिशिंगणापूर येथे थोड्याच वेळात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

  अहमदनगर -

  खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शनिशिंगणापूर येथे थोड्याच वेळात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

  तर शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष

  जलसंधारण मंत्री शंकर गडाख उपस्थित कार्यक्रम

 • 31 Jul 2021 10:12 AM (IST)

  गणपतराव देशमुख यांचे पार्थिव सांगोल्यात दाखल

  गणपतराव देशमुख यांचे पार्थिव सांगोल्यात दाखल

  अंत्यदर्शनासाठी नागरिकांची तुफान गर्दी

  अखेरचा निरोप घेण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

  नागरिकांच्या अश्रुंचा बांध फुटला

  फुलांनी सजवलेल्या ट्रक मधून गणपतराव देशमुख यांची अंत्ययात्रा सुरू होणार

  सांगोला वासीयांचा गणपतराव देशमुखांना अखेरचा लाल सलाम

  मार्केटयार्डपासून सुरु होणार अंत्ययात्रा

 • 31 Jul 2021 09:51 AM (IST)

  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ

  - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ!

  - करिश्मा हिचा तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

  - याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  - बर्डी पोलिसांनी केली सासू, सासऱ्यासह तिघांना अटक

  - करिश्माचा पती पलाश पुरुषोत्तम दरोकर आणि प्रशांत टोंगसे अशी फरार आरोपींची नावे

  - करिश्मा पलाश दरोकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

  - पोलिसांनी चौकशी करून पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाय

 • 31 Jul 2021 09:48 AM (IST)

  औरंगाबादेत केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची पदे भरण्यास जिल्हा परिषदेला लागेना मुहूर्त

  औरंगाबाद -

  औरंगाबाद जिल्ह्यात गुणवत्तेचे वाजणार तीनतेरा

  केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची पदे भरण्यास जिल्हा परिषदेला लागेना मुहूर्त

  जिल्ह्यात 98 मुख्याध्यापकांची तर 89 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त

  की पोस्ट वरील पदे रिक्त असल्यामुळे गुणवत्तेवर होणार परिणाम

  केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांची पदे लवकर भरण्याची मागणी

 • 31 Jul 2021 09:48 AM (IST)

  मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत प्रत्येक दिवशी 1 लाख बाधित होणार, विभागीय आयुक्तांचा अंदाजाने सगळेच हादरले

  तिसऱ्या लाटेत मराठवाड्यात 1 लाख लोक बाधित होण्याची शक्यता

  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्तवला अंदाज

  संभाव्य लाट रोखण्यासाठी उपयुक्ताच्या नेतृत्वात कोअर टीमची स्थापना

  मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लागले कमला

 • 31 Jul 2021 09:46 AM (IST)

  तिसऱ्या लाटेत मराठवाड्यात 1 लाख लोक बाधित होण्याची शक्यता

  तिसऱ्या लाटेत मराठवाड्यात 1 लाख लोक बाधित होण्याची शक्यता

  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्तवला अंदाज

  संभाव्य लाट रोखण्यासाठी उपयुक्ताच्या नेतृत्वात कोअर टीमची स्थापना

  मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लागले कमला

 • 31 Jul 2021 09:42 AM (IST)

  तिसऱ्या लाटेत मराठवाड्यात 1 लाख लोक बाधित होण्याची शक्यता, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा अंदाज

  तिसऱ्या लाटेत मराठवाड्यात 1 लाख लोक बाधित होण्याची शक्यता

  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्तवला अंदाज

  संभाव्य लाट रोखण्यासाठी उपयुक्ताच्या नेतृत्वात कोअर टीमची स्थापना

  मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लागले कमला

 • 31 Jul 2021 09:36 AM (IST)

  Ganpatrao Deshmukh : भाई गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सांगोल्यात येणार

  सांगोला : भाई गणपतराव देशमुख यांचं पार्थिव थोड्याच वेळात त्याच्या सांगोलामधील निवासस्थानी येणार, निवासस्थानी सांगोलावासीय जमायला सुरुवात, अनेक राजकीय नेते,कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर घेणार लाडक्या आबासाहेबांचं अंत्यदर्शन, निवासस्थानी चंद्रकांत देशमुख आणि अन्य नातेवाईक उपस्थित, निवासस्थानापासून सांगोला सहकारी सूतगिरणच्या आवारापर्यंत निघणार अंत्ययात्रा

 • 31 Jul 2021 09:34 AM (IST)

  विरारमध्ये तृतीयपंथीयांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस

  विरार : वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने विरारमध्ये तृतीयपंथीयांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. वसई विरार महानगर पालिका क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षा गीता जाधव यांच्या पुढाकारातून, विरारच्या नालेश्वर या ठिकाणी राहणाऱ्या तृतीयपंथीयांना ही लस देण्यात आली आहे. लसीच्या तुटवड्यामुळे,लसीकरण केंद्रावर रांगा लावून सुद्धा नागरिकांना लस मिळत नसतानाही गीता जाधव यांच्या पुढाकाराने तृतीयपंथी यांना लसीचा पहिला डोस मिळाल्याने तृतीयपंथीनी समाधान व्यक्त केले आहे.

 • 31 Jul 2021 08:41 AM (IST)

  मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर आजही गर्दी

  - मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर आजही गर्दी

  - ५०० कोव्हीडशिल्डचे डोस प्राप्त झालेत ज्यामुळे सकाळपासुन रांगा…

  - रांगेत उभे असलेल्या नागरिकां उत्तम पध्दतीने लस प्राप्त होण्यासाठी पेंडाॅलमध्ये बसण्याची केली सोय…

  - पावसाळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तंबुत नागरिकांना प्रतिक्षा कक्ष बनवला आहे

  - सकाळी ९ ते ५ ही वेळ देणेयातमआलीये…

  - ७४ सेंटरवर कोव्हीशिल्ड दिली जाणारेय…

  - अपंग आणि अंधांनाही लस देण्यात येणारेय…

  - कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याने दुसरा डोस दिला जात नाहीये

 • 31 Jul 2021 08:40 AM (IST)

  बनावट दुध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी आणले उघडकीस

  अहमदनगर

  जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दुध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी आणले उघडकीस

  खर्डा आणि नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे अड्डे उध्वस्त

  2 हजार 118 लिटर बनावट दुध करण्यात आले नष्ट

  तर तब्बल 2 लाख रूपये किमतीचे बनावट दुध बनवण्याचे साहित्य जप्त

  पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची धडाकेबाज कारवाई

 • 31 Jul 2021 08:39 AM (IST)

  लाडक्या नेत्याचा निरोप घेण्यासाठी सांगोला शहरात आबालवृद्धांची गर्दी 

  गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सांगोल्यात पोहोचणार

  लाडक्या नेत्याचा निरोप घेण्यासाठी सांगोला शहरात आबालवृद्धांची गर्दी

  अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू

 • 31 Jul 2021 08:34 AM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात एकाच रात्री 3 एटीएम फोडून 55 लाखांची रोकड लंपास

  बुलडाणा

  जिल्ह्यात एकाच रात्री 3 एटीएम फोडून 55 लाखांची रोकड लंपास

  जिल्ह्यात चोरांची टोळी सक्रिय

  जिल्ह्यातील एसबीआय च्या शेलूद, उंद्री आणि पळशी येथील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आणि रोकड लंपास केलीय

  पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

 • 31 Jul 2021 08:33 AM (IST)

  आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी वाघाच्या अवयवांची तस्करी, नागपूर वनविभागाची मध्यप्रदेशात मोठी कारवाई

  - आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी वाघाच्या अवयवांची तस्करी

  - नागपूर वनविभागाची मध्यप्रदेशात मोठी कारवाई

  - मध्य प्रदेशातील बिछवासहानी गावातून एका आरोपीला अटक

  - आरोपीच्या घरातून वाघाची संपूर्ण कातडी, वाघाचे चार पंजे आणि मोबाईल जप्त

  - आठ दिवसांपासून आरोपी वनविभागाला चकवा देत होता

  - आरोपीने कुठल्या वाघाची शिकार केली? याचा शोध सुरु

 • 31 Jul 2021 08:32 AM (IST)

  पुण्यात कोविशील्ड लसीचे डोस संपल्याने शहरात आज आणि उद्या कोविशील्ड लसीचे सर्व केंद्रे बंद असणार

  पुणे -

  - पुण्यात कोविशील्ड लसीचे डोस संपल्याने शहरात आज आणि उद्या कोविशील्ड लसीचे सर्व केंद्रे बंद असणार,

  - शहरातील सहा केंद्रावर आज कोवेक्सिन लसीचे डोस दिले जाणार,

  - लसींचा पुरवठा वेळेत होत नसल्याने पुण्यात लसीकरण मंदावले,

  - आठवड्यातुन तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात येत असून पुणेकरांना लस घेण्यासाठी सातत्याने वाट पहावी लागतेय.

 • 31 Jul 2021 08:32 AM (IST)

  विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी कोरोनाबाधित, नाशिक जिल्ह्यातील पाच शाळा बंद

  नाशिक जिल्ह्यातील पाच शाळा बंद

  विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी कोरोनाबाधित

  सिन्नर,देवाळा, मालेगाव, निफाड तालुक्यांतील शाळांचा समावेश

 • 31 Jul 2021 06:39 AM (IST)

  आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना आग

  हिंगोली -

  आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना आग

  शेवाळा रोडवरील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स मधील दुकानां आग

  किराणा ,ऑटोमोबाईल्स सह इतर दुकानातील माल जळून खाक

  आगीचे कारण अस्पष्ट

 • 31 Jul 2021 06:37 AM (IST)

  माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव पेनुरकडे रवाना

  सोलापूर -

  माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव पेनुरकडे पहाटेच रवाना

  गर्दी होऊ नये यासाठी नातेवाईकाने पहाटे पार्थिव हलविले

 • 31 Jul 2021 06:36 AM (IST)

  अजित पवारांकडून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली

  ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! गणपतराव आबांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे.

Published On - Jul 31,2021 6:28 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें