नारायणगडावरील दसरा मेळाव्यावरून वातावरण तापलं, जर एकनाथ शिंदेंविरोधात बोलाल तर…, मनोज जरांगे पाटील यांना थेट मोठा इशारा

जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध असल्याने बीडमध्ये वातावरण तापले आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याला विरोध केला जात आहे.

नारायणगडावरील दसरा मेळाव्यावरून वातावरण तापलं, जर एकनाथ शिंदेंविरोधात बोलाल तर..., मनोज जरांगे पाटील यांना थेट मोठा इशारा
manoj jarange patil and eknath shinde
| Updated on: Oct 16, 2026 | 9:24 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मराठा बांधवाना उद्देशून भाषण करण्याची तयारी एकीकडे चालवली आहे. तर दुसरीकडे या भाषणात जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक जरी वक्तव्य केले तर आम्ही सहन करणार नाही अशी भाषा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आता केली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये वातावरण तापले आहे.

जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध असल्याने बीडमध्ये वातावरण तापले आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याला विरोध केला जात आहे. जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेऊ नये, कारण इकडे ग्रामीण भागात दुष्काळ आहे असे म्हटले जात आहे. मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. त्या ठिकाणी दुष्काळ नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी म्हटले आहे.  श्री क्षेत्र नारायण गडावरील जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंबद्दल बोलल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराच  शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी दिला आहे.

Loading...

राज्याच्या प्रमुखांचे माझ्याकडे जे पुरावे होते ते मी दिले, फोन उचलले नाहीत हा नरेटीव्ह पसरवला जातोय.एकनाथ शिंदे साहेबांना शिवी दिली म्हणजे आम्हाला शिवी दिली, आम्ही फक्त फुलं उधळायलाच पाहिजेत का? जरांगे पाटलांच्या होणाऱ्या सभेला विरोध केला, त्यावेळी मी समर्थनार्थ पोस्ट सोडली, तेव्हा कमेंटमध्ये शिव्या देण्यात आल्या, ते मला खटकलं म्हणून विरोध करत आहे असे स्वप्नील गलधर यांनी म्हटले आहे.

तर सर्वत्र गुन्हे दाखल करु

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कोणी बोलल्यास खपवून घेतले जाणार नाही, सर्वत्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.काही वेळापूर्वीच आम्ही एक गुन्हा दाखल केला आहे.एकनाथ शिंदे साहेबांकडे निरोप पाठवला जातोय आम्हाला भेटा, शिंदेसाहेब मोठ्या मनाचे आहेत. नक्कीच माफ करतील असेही स्वप्नील गलधऱ यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us