चक्क मराठी मुलीनं ठेवले रोजे, नाशिकमधील बड्या कंपनीत जबरदस्ती धर्मांतर! कुटुंबीय हादरले

नाशिकमधील एक कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीत काम करणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांना धर्मांतर करण्यास जबरदस्ती करण्यात आली.

चक्क मराठी मुलीनं ठेवले रोजे, नाशिकमधील बड्या कंपनीत जबरदस्ती धर्मांतर! कुटुंबीय हादरले
Nashik Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 1:22 PM

गेल्या काही दिवसांपासून लिंगपिसाट अशोक खरातमुळे नाशिक चांगलेच चर्चेत आहे. आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचा धक्कादायक कारभार उघड झाला आहे. या कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना चांगल्या करिअरचे स्वप्नांन दाखवून त्यांच्यासोबत नको ते केले. कंपनीतील काही टीम लीडर्सकडून आठ तरुणींचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचे आणि त्यांच्यावर विशिष्ट धर्माची संस्कृती लादण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

Loading...

नाशिकमधील या प्रकाराची माहिती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून समोर आली. जुलै 2022 पासून कंपनीत नोकरी करणाऱ्या एका आधुनिक तरुणीच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला. जीन्स-टॉप घालणारी ही मुलगी अचानक पंजाबी ड्रेस घालू लागली. तिने सलग महिनाभर ‘रोजे’ ठेवल्याचे पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, कंपनीत चाललेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांची धक्कादायक माहिती समोर आली.

एकूण 9 गुन्हे दाखल

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही टीम लीडर्स तरुणींचा पद्धतशीर ‘ब्रेनवॉश’ करत होते. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवले जात होते. दोन विवाहित महिलांसह आठ तरुणींच्या लैंगिक शोषण आणि विनयभंगाचे एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ महिलांनाच नव्हे, तर एका तरुणालाही बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांच्या अनुभवी निरीक्षकांचा समावेश आहे. आतापर्यंत 7 पैकी 6 संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी

या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, या कंपनीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले. “इतर कोणत्याही कंपनीत अशा प्रकारचे शोषण होत असल्यास तरुणींनी भय न बाळगता तक्रार नोंदवावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us