कल्याण, ठाणे आणि मुंबईत सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी, उद्याही पावसाचा अंदाज

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.

कल्याण, ठाणे आणि मुंबईत सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी, उद्याही पावसाचा अंदाज
raining in mumbai
| Updated on: Sep 29, 2026 | 7:34 PM

राज्यात पावसाचा जोर कमी होत असून मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी दाखवल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळपासूनच कल्याण येथे ढगाळ वातावरण असून सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.

रिमझिम सरींसह राज्यातील अनेक भागांत वीजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलेच धुमशान घातल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी पावसाआधी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच धावपळ उडाली. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाचा फटका बसताच आसरा शोधावा लागला. वाऱ्यांच्या संगतीने आलेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा बदललेल्या वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे.

Loading...

कल्याण, ठाणे, मुंबई, नाशिक (घाटमाथा), रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, शहापूर, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून उद्याही या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात कुठेही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नसल्याने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता दिसत नाही. येत्या दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र ती सर्वदूर नसणार आहे. येणाऱ्या पाच दिवसात राज्यात मुसळधार तसेच सर्वदूर पावसाची शक्यता नाही. मराठवाड्याची सर्व जिल्ह्यात पावसाची तुट सर्वाधिक आहे. रब्बी हंगामात पाऊस चांगला राहील अशी आशा करणे चांगले राहणार नाही.पुणे परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असली तर ती सर्वदूर नाही.

अमरावती

अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ आता कपाशीच्या पीकही नुकसानीच्या उंबरठ्यावर आहे. पाऊसच नसल्याने कपाशी पिकावर लाल्या, कोकळा, मावा तुडतुड्यासारख्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. पावसा अभावी कपाशीची वाढ ही खुंटली असून कपाशीची पीक वाळायला सुरुवात झाली आहे. सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे.

चाळीसगाव, जळगाव

चाळीसगावात ८५ हजार हेक्टरवरील पिके करपली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ८५ हजार हेक्टर खरीप क्षेत्रातील पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. साधारण दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने उन्हाच्या कडाक्याने पिके करपली आहेत. तळेगाव महसूल मंडळातील हिरापूर, शेवरी, अंधारी, हातगाव, माळशेवगे, ब्राह्मणशेवगे आणि करजगाव परिसरात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक गावांत चारा-पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us