थेट जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर, गोकुळच्या निवडणुकीत रात्री मोठा राडा..
Gokul Election Result 2026 : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या. पार रात्री उशीरात सर्व गोष्टी सुरू होत्या. त्यातच सतेज पाटलांनी जोपर्यंत पूर्ण निकाल लागणार नाही, तोपर्यंत मतदान केंद्र सोडणार नसल्याची भूमिका घेतली.

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या. रात्री उशीरा यादरम्यान फुल ड्रामा सुरू होता. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील त्यांच्य पॅनलने बाजी मारली. एकूण 25 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील 13 जागांवर सतेज पाटील यांचे उमेदवार तर 12 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. मात्र, जिंकलेल्या उमेदवाराला पराभूत म्हणून घोषित केले. ज्याने एकच खळबळ उडाली. गोकुळच्या निवडणुकीत शेवटी मोठा राडा झाला. या निवडणुकीत सतेज पाटलाविरोधात थेट खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र, मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मोठी लढत दिली. ज्याचा कोणीही विचार केला नाही, असा विजय यांचा झाला. हेच नाही तर नवीद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांच्या पराभवामुळे महायुतीला थेट धक्का बसला.
त्यातच विश्वास पाटील आणि युवराज पाटील यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आला. दिवसभरात गोकुळच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडताना दिसल्या. शौमिका महाडिक यांचा फक्त सात मतांनी पराभव झाला. सुरूवातीला गोकुळचा निकाल 14-11 असा सांगितला जात होता. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे सचिन घोरपडे विजयी झाले होते.
पण फेरमतमोजणीत सचिन घोरपडे यांचा पराभव झाला. महायुतीचे प्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे अमर पाटील यांचा विजय झाला. सतेज पाटलांच्या पॅनलचा एक जिंकलेला उमेदवार पराभूत झाला. सतेज पाटलांचा विजयी झालेला उमेदवार पराभूत झाला. ज्यामुळे निकाल हा 13-12 असा झाला. यादरम्यान मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ बघायला मिळाला.
या सर्व गोंधळात सतेज पाटील यांनी मतमोजणी केंद्र गाठले. सतेज पाटील येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे गराडा घातला. अधिकृत निकाल लागणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका सतेज पाटलांनी घेतली. या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. नक्की काय होणार हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते. प्रतिष्ठित राजकीय नेत्यांनी या निवडणुकीसाठी आपली पूर्ण प्रतिष्ठा लावली होती.