कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या सांगण्यावरूनच..

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News : ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. थेट कुस्तीपटूने आपल्या आयुष्याचा शेवट केला. कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी घेतलेल्या निर्णयाने क्रीडा विश्वाला धक्का बसला.

कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या सांगण्यावरूनच..
Wrestler Ashwini Mohite Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 11:21 AM

धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. हा अपघात की स्वत: अश्विनी यांनीच लेकरांसोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, यावरून विविध चर्चा सध्या रंगत आहेत. त्यातच आता मोठी अपडेट पुढे आली. काैटुंबिक कलाहातूनच अश्विनी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.  या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एका मुलीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्विनी या आपल्या मुलांसह किल्ल्यावर आल्या होत्या. खवड्या डोंगराची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला.

यादरम्यानच अश्विनी यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. अश्विनी पौळ यांनी 100 फूट खोल दरीत उडी घेतली. त्यांच्या वडिलांनी यादरम्यान बोलताना त्यांच्या सासरच्या लोकांवर आरोप केले. अश्विनी पौळ गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होत्या. सासरच्या लोकांकडून त्यांना त्रास दिला जात होता.

अश्विनी पौळ यांनी 100 फूट खोल दरीत उडी घेतली. त्यांच्या वडिलांनी यादरम्यान बोलताना त्यांच्या सासरच्या लोकांवर आरोप केले. अश्विनी पौळ गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होत्या. सासरच्या लोकांकडून त्यांना त्रास दिला जात होता. अश्विनी पौळ यांनी असा निर्णय काय घेतला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. नळदुर्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लातूर जिल्हातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथून अश्विनी पौळ आपल्या तीन लेकरांसह नळदुर्ग पाहण्यासाठी पोहोचल्या. अश्विनी पौळ यांच्याबाबत आता मोठी माहिती पुढे येतंय. एमएसएफमध्ये त्या नोकरीसाठी होत्या. त्यांचे पती मनोहर हे रिक्षाचालक होते. पतीच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला. तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन लेकरांसोबत राहत होत्या. माहेरी आपल्या लेकरांना घेऊन त्या आल्या होत्या आणि माहेरीच राहत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us