Kokan Rain : कोकणात पावसाची जोरदार ‘बरसात’, करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळली, वाहतूक ठप्प

| Updated on: Aug 08, 2022 | 1:32 PM

कोकणात कोसळधार

Kokan Rain : कोकणात पावसाची जोरदार बरसात, करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळली, वाहतूक ठप्प
Follow us on

सिंधुदुर्ग : मागच्या काही दिवसांपासून राज्यभर पाऊस पडतोय. अश्यात कोकणात तर सरीवर सरी (Kokan Rain) कोसळताहेत. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसला आहे. असून घाटातील संरक्षक भिंत कोसळून (Wall Collapse) घाटमार्ग बंद झाला आहे. मागील 24 तासात वैभववाडीत 127 मिमी पाऊस पडला. या पावसाचा फटका तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या करूळ घाटाला बसला. रात्री दहाच्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. फोंडाघाट आणि आंबोली मार्गे या मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.

संरक्षक भिंत कोसळली

मागील 24 तासात वैभववाडीत 127 मिमी पाऊस पडला. या पावसाचा फटका तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या करूळ घाटाला बसला. रात्री दहाच्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. फोंडाघाट आणि आंबोली मार्गे या मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.

रेनअलर्ट!

आजही मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, ठाणे आणि पालघरला 5 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. मच्छिमारांनाही हवामान खात्याकडून इशाराही देण्यात आलाय. पुढचे दोन दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीत दरड कोसळली

रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. सर्वच नद्या दुथडी भरून वाहताहेत. काजळी नदी पात्रा बाहेर वाहतीये. हवामान खात्याने आजही दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस होतोय. अश्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. तिथेच दरड कोसळली आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.