Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय भुकंपाची शक्यता वाढली, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनियांची भेट, पुढची वाटचाल काँग्रेससोबत?

निती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने नितेश कुमार हे आज राजधानी दिल्लीत उपस्थित होते आणि त्याचवेळी या भेटीगाठी घडलेल्या आहेत. त्यामुळे नितेश कुमार यांची पुढची वाटचाल काँग्रेस सोबत असणार आहे का? असा सवाल असा बिहारच्या राजकारणात विचारण्यात येत आहे.

Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय भुकंपाची शक्यता वाढली, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनियांची भेट, पुढची वाटचाल काँग्रेससोबत?
बिहारमध्ये राजकीय भुकंपाची शक्यता वाढली, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनियांची भेट, पुढची वाटचाल काँग्रेससोबत?
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Aug 07, 2022 | 11:07 PM

पाटणा : गेल्या महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपाने संपूर्ण देशाचा लक्ष वेधून घेतला राज्यातला ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचा नवं सरकार स्थापन झालं, असंच काहीसं आता बिहारमध्ये घडण्याच्या तयारीत आहे. बिहारमधली राजकीय समीकरणात सध्या बदलण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितेश कुमार (Nitish Kumar) आणि भाजप (BJP) यांच्यात फार पटत नसल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज दिल्लीमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतलीय. निती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने नितेश कुमार हे आज राजधानी दिल्लीत उपस्थित होते आणि त्याचवेळी या भेटीगाठी घडलेल्या आहेत. त्यामुळे नितेश कुमार यांची पुढची वाटचाल काँग्रेस सोबत असणार आहे का? असा सवाल असा बिहारच्या राजकारणात विचारण्यात येत आहे.

मंगळवारी मोठा निर्णय जाहीर करणार?

याबाबत नितीश कुमार हे मंगळवारी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. यात पाटण्यामध्ये या बैठकीला सर्वपक्षी आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे बिहारचे राजकारण तापले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपपासून दूरच

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे भाजपपासून दूर राहणेच पसंत करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलै रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर 22 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.25 जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र तेव्हाही ते गेले नाहीत. आजही नितीश कुमार यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले होते परंतु ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

वादाची ठिणकी कुठे पडली?

बिहारच्या राजकीय वर्तुळात हे सर्वश्रुत आहे की आरसीपी सिंह यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि ते जनता दला युनायटेडकडून ​​भाजपचच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचेही बोलले जाते. कदाचित त्यामुळेच गेल्या वर्षी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा नितीशकुमार यांच्या संमतीशिवाय आरसीपी सिंग केंद्रात मंत्री झाले. तेव्हापासूनच या संघर्षाला सुरूवात झाल्याचे बोलले जाते. याशिवाय भाजपचे अनेक निर्णय हे नितीश यांच्या मनाविरुद्ध झाल्याचीही चर्चा आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें