कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्स्प्रेसमधून निघाला धूर, प्रवाशांची एकच पळापळ

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकादरम्यान कोयना एक्सप्रेसमधून धूर निघाल्याने घबराट पसरल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे, या घटनेने काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे म्हटले जात आहे.

कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्स्प्रेसमधून निघाला धूर, प्रवाशांची एकच पळापळ
chaos in koyna express
| Updated on: Aug 29, 2026 | 8:31 PM

मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्सप्रेसमधून धुर निघाल्याची घटना घटल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरल्याची घटना घडली आहे. या धुरामुळे कोयना एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी रुळांवर घाईघाईत उतरुन आपला जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाल्याचे म्हटले जात आहे.

मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकात सायंकाळी कोयना एक्सप्रेस जात असताना तिच्या डब्यातून अचानक धुराचे लोट उठू लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेने घाबरलेल्या प्रवाशांनी  जीव वाचवण्यासाठी या एक्सप्रेसमधून खाली उड्या मारल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन प्रवासी किती घाबरलेले आहेत हे दिसत आहे. या संदर्भात मध्य रेल्वेच्या सूत्रांनी कोणतीही माहिती समाजमाध्यमावर पोस्ट केलेली नाही. ही घटना सायंकाळी ६.१५ वाजताची असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे काही वेळ लोकल विस्कळीत झाल्याचे म्हटले जात आहे.

chaos in koyna express

रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी मुख्य लाईनवर विद्याविहार ते ठाणे मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आणि ठाणे ते वाशी-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार असल्याने अनेक लांबपल्ल्याच्या गाड्यांना वळवण्यात येणार आहे.

ट्रान्सहार्बर बंद

ठाणे ते वाशी – नेरुळ ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक घेतला असल्याने या मार्गावर या कालावधीत एकही लोकल ट्रेन धावणार नाही.

Follow Us