महाराष्ट्रातील भाजपच कर्नाटक सरकारला फूस लावते, ‘या’ संघटनेचा गंभीर आरोप…

| Updated on: Dec 02, 2022 | 7:57 PM

कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील गावांवर दावा करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच कर्नाटक सरकारला फूस लावते.

महाराष्ट्रातील भाजपच कर्नाटक सरकारला फूस लावते, या संघटनेचा गंभीर आरोप...
Follow us on

सोलापूर: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांसह अक्कलकोट आणि पंढरपूरसह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकीय ढवळून निघाले आहे. त्यानंतर जत तालुक्यात कर्नाटकने पाणी सोडून आणखी डिवचण्याचा प्रयत्न कर्नाटकने केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विविध संघटनांकडून जोरदार विरोध दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे याता ठाकरे गटाने याबाबत कठोर भूमिका घेत भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावादावरून आता ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. कर्नाटकवाल्यानो मस्तवाल पणाने वागाल तर कर्नाटकची एकही एसटी महाराष्ट्रातील एकाही गावात फिरू देणार नाही असा सज्जड दमही त्यांना भरण्यात आला आहे.कर्नाट

कच्या मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी कर्नाटकात येऊ नये असा दम देत आहेत तरीही महाराष्ट्रातील शिंदे सरकार मूग गिळून गप्प का आहे? असा सवाल ठाकरे गटाने शिंदे गटाला केला आहे. त्यामुळे शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानंतर राज्यातील विरोधी गटाने ज्या प्रमाणे कर्नाटकवर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला होता.

कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील गावांवर दावा करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच कर्नाटक सरकारला फूस लावते का असा संशय मला येतो आहे असा टोला शरद कोळी यांनी लगावला आहे.

कर्नाटकने नेहमीच आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर राज्यातील सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही जोरदार टीका केली असली तरी केंद्रातील आणि कर्नाटकातील भाजपच्या सरकारमुळे राज्यातील भाजपवर टीका होऊ लागली आहे.

त्यामुळे आता शरद कोळी यांनी मराठी बांधवानो तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर कोणाच्या आदेशाची वाट बघणार नाही असा इशारा दिला आहे.

कर्नाटकात घुसून तेथील मंत्र्यांना जाब विचारण्याची ताकद ताकद आणि धमक शिवसेनेत आहे असंही यावेळी सांगण्यात आले आहे.