मोठी बातमी! शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून मिळणार डच्चू, या मंत्र्यांचा लागणार नंबर, एकनाथ शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये धूसफूस सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून मिळणार डच्चू, या मंत्र्यांचा लागणार नंबर, एकनाथ शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब
Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 8:29 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंंघाचा समावेश आहे. दरम्यान या मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. यावरून महायुतीमधील धुसफूस देखील चव्हाट्यावर आली आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाचा आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठे संकेत दिले आहेत. परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असे संकेत  आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून देण्यात आले आहेत.

आज भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यात आली. या सभेला भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. तसेच  शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी परफॉर्मन्स नसलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार यावर बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठे संकेत दिले आहेत. शिंदे साहेबांचा फार्मूला ठरलेला आहे अडीच – अडीच वर्षांचा. परफॉर्मन्स पाहून काही रिप्लेस होणारचं आहेत, त्यामुळं तोंडात साखर पडणार, असे  संकेत भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले आहेत, त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार? यावरून चर्चेला उधाण आलं आहे.

Loading...

दरम्यान दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये धुसूफूस सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाकडून देखील दावा करण्यात आला होता. परंतु ऐनवेळी महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आली. महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आलेली असताना देखील या जागेवरून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बंड टळले असे वाटत होते. परंतु आता शिवसेना शिंदे गटाकडून सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us