Bharati Pawar | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण

| Updated on: Jan 06, 2022 | 12:14 PM

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Bharati Pawar  | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
BHARATI PAWAR
Follow us on

मुंबई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत आहे. खुद्द भारती पवार यांनी याबाबत ट्विटरव माहिती दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांनी कालच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कोरोना प्रसाराबाबत आढावा बैठक घेतली होती.

संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. अशा परिस्थिती देशातील नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. मागील काही दिवसांपासून मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर आदी नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तत्काळ कोरोना प्रतिबंधक चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाचा संसर्ग

दरम्यान, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.

इतर बातम्या :

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार

भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?

Aurangabad News: सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची शंभरी पार, काय सुरु, काय बंद, कोणते नवे नियम? वाचा सविस्तर