AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले तर आठ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?
कोरोना तुलनात्मक आकडेवारी (Facebook : Pradip Awate)
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले तर आठ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. देशभरात 98 हजार कोरोना रुग्णांची नोंद झालीय. मुंबईतही 15 हजार 166 रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत काही गोष्टी स्पष्टपणानं मांडल्या आहेत. ओमिक्रॉनमुळं आलेली सध्याची लाट सौम्य आहे. मात्र, निष्काळजी व्हायला नको आणि निष्कारण भीतीची लाट देखील नको, असं आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केलं आहे.

लक्षणं असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी

राज्यात कोविडचे २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले असून मुंबईतील बुधवारी नोंदवले गेलेल्या 15014 रुग्णांपैकी 87 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुणे जिल्ह्यातील आजच्या 2833 रुग्णांपैकी 85 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत.

मुंबईतील रुग्णसंख्येंसदर्भातील ट्विट

सक्रिय रुग्णसंख्या आणि बेड उपलब्धतता

राज्यातील कोविड साठीच्या एकूण बेड संख्येच्या 3.84 टक्के बेड्सवर सध्या रुग्ण आहेत. बाकीची बेड मोकळी आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना केली तर 4 मार्च 2021 रोजी राज्यात 85144 ॲक्टिव रुग्ण होते आणि आज 87505 ॲक्टिव रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत जवळपास एवढ्याच रुग्ण संख्येत 8527 रुग्ण ऑक्सिजन बेड वर होते आज त्यांची संख्या 2560 म्हणजे जवळपास एक तृतीयांश पेक्षाही कमी आहे.

डॉ. प्रदीप आवटे यांची फेसबूक पोस्ट

भीतीची लाट नको

डॉ. प्रदीप आवटे यांनी ओमिक्रॉनमुळे आलेली ही लाट सौम्य आहे,असे आता तरी दिसत असल्याचं म्हटलंय. नागरिकांनी निष्काळजी व्हायला नको पण निष्कारण भीतीची लाट देखील नको, असल्याचं मत आवटे यांनी मांडलंय.

इतर बातम्या:

जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?

Corona Task Force | कोरोनाला थोपवण्यासाठी मोठे पाऊल, IMA च्या महाराष्ट्र शाखेकडून टास्क फोर्सची स्थापना, उपचार पद्धतीविषयी माहिती देणार

Maharashtra Task Force Member Pradip Awate said there is no need to panic about corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.