AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad News: सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची शंभरी पार, काय सुरु, काय बंद, कोणते नवे नियम? वाचा सविस्तर

जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांनी शंभराचा आकडा पार केला. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात 120 रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरात 103 रुग्ण तर ग्रामीण भागात 17 रुग्ण आढळले. तर दोन जणांचा मृत्यू झाला.

Aurangabad News: सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची शंभरी पार, काय सुरु, काय बंद, कोणते नवे नियम? वाचा सविस्तर
कोरोना रुग्णांचा आकडा वाढता असला तरी किशोरवयीनांच्या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळतोय, हा दिलासा.
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 10:34 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांनी शंभराचा आकडा पार केला. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात 120 रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरात 103 रुग्ण तर ग्रामीण भागात 17 रुग्ण आढळले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. शहराचा पॉझिटिव्ही रेट आता 4.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बंद केलेले कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.

बहुतांश रुग्ण घरी, ट्रीटमेंट कशी?

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सांगितले की, जास्तीत जास्त कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याकडे कल आहे. त्यांच्यासाठी कॉल सेंटरही सुरु करण्यात येणार आहे. डॉक्टर होम आयसोलेशनमधील रुग्णांशी कॉल सेंटरमधून संपर्क साधतील. कॉल सेंटरसाठी दोन रुग्णवाहिका सज्ज आहेत.

महत्त्वाचेः  ज्या घरातील कुटुंबियांचे लसीकरण पूर्ण असेल तेथील कोरोना रुग्णांनाच होम आयसोलेशनची सुविधा आहे. पण 7 दिवसांच्या क्वारंटाईनच्या काळात कुटुंबातील एकाही सदस्याला घराबाहेबर जाता येणार नाही.

काय सुरु, काय बंद?

– महापालिकेच्या कक्षेत येणाऱ्या शहारतील शाळांतील 1ली ते 8 वीचे वर्ग बंद – नववी आणि दहावीचे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. – ग्रामीण भागातील शाळांचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्या निर्णय होईपर्यंत सुरूच राहतील. – सुटीच्या दिवशी हुर्डा पार्ट्यांवर गर्दी होते. त्यामुळे हुरडा पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. – शहराबाहेरील फार्महाऊस, रिसॉर्टवरही बंदी. – लसीकरण आणि मास्क नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. – अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी आहे. – लग्नातील गर्दीवरही अधिकाऱ्यांचे लक्ष असेल. मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या बुकिंगची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त उपस्थितीस परवानगी नाही. – गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमधील उपस्थितीचे व्हिडिओ शूटिंग घेतले जाईल. – कोरोनाचे संकट पाहता, शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. केवळ वैद्यकीय कारण असेल तरच रजा मिळेल.

कोणते पाच कोविड सेंटर सुरु होणार?

शहरातील किलेअर्क, एमआयटी कॉलेजमधील दोन वसतीगृहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह, गेवगिरी महाविद्यालयाच्या मुला-मुलींचे वसतिगृह, आयएचएम महाविद्यालयाचे वसतीगृह ही पाच कोविड सेंट लगेच सुरु केली जाणार असल्याची माहिती माहापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

घाटी रुग्णालयाची स्थिती काय?

घाटी रुग्णालयात वॉर रुम तयार करण्यात आली आहे. येथे हजार खाटांचे नियोजन आहे. सध्या घाटीत केवळ 8 कोरोना रुग्ण दाखल आहेत. 3 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. वॉर रुमममध्ये डॉ. आदित्य सोनार, डॉ. शरयू पारोदे, डॉ. शुभांगी उंबरकर, योगेश रामपूरकर, अर्जुन जाधव, अनूसया घोगरे, विजय पवार हे असतील.

इतर बातम्या-

काँग्रेसच्या काही मंत्र्यांवर आमदार नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार : सूत्र

तूर पीक : हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.