…मगर असो वा दाढीवाला अजगर असो कोणी वाचणार नाही, पुर्णेकर हत्ये प्रकरणात सदावर्ते म्हणाले की…

वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अटक झाली, ते स्पॉटवर होते का? तरी अटक झाली ना? मराठा मंत्र्यामुळे अटक झाली असेही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

...मगर असो वा दाढीवाला अजगर असो कोणी वाचणार नाही, पुर्णेकर हत्ये प्रकरणात सदावर्ते म्हणाले की...
lawyer Gunratna Sadavarte
| Updated on: Oct 18, 2026 | 7:43 PM

ठाण्यातील मनोरमानगर येथील कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री गोळीबार आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती. या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यावर प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांनी आरोप केले होते. राजेंद्र शिंदे यांची चौकशी देखील पोलिसांनी केली आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणारे आहे. वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख हत्यांकाडात अटक झाली आहे. ते स्पॉटवर होते का ? तरीही अटक झाला ना ? मराठा मंत्र्यामुळे अटक झाली आहे. आता या प्रकरणातही इथे कितीही मोठा मगर असो वा दाढीवाला अजगर असो वाचणार नाही असे वकील सदावर्ते यांनी म्हटले आहे.

राजेंद्र शिंदे म्हणाले होते की बिग बॉसमधून बाहेर निघालो होतो, त्यानंतर बिग बॉसमध्ये काही मजा नाही. प्रताप सरनाईक भेटीला आले आणि शिंदे यांनी सांगितले म्हणून प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे ? शिंदे यांनी फक्त चौकशीसाठी हस्तक्षेप केलाय का? अटक का नाही केली ? वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अटक झाली, ते स्पॉटवर होते का? तरी अटक झाली ना? मराठा मंत्र्यामुळे अटक झाली. शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून चौकशी आहे, ही त्यांची ताकद आहे असे प्रताप सरनाईक म्हणतात. ही कोणती ताकद आहे? असाही सवाल सदावर्ते यांनी केला आहे.

Loading...

गणपती काळात एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदे यांच्या घरी गेले होते, तेव्हा फोटो होते.आता ते डिलीट करण्यात आले. या तांत्रिक गोष्टींचा तपास होणे गरजेचे आहे, या मागे मोठे काही दडले आहे का? इथे कितीही मोठा मगर असो वा दाढीवाला अजगर असो वाचणार नाही असेही सदावर्ते म्हणाले.

शिंदे तपासात हस्तक्षेप करत आहेत हे अक्षम्य आहे

प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे की एखाद्या गावात जर प्रेत झाले तर सरपंचाला कितीही काम असले तरी त्याला जावे लागते, एकनाथ शिंदे आले नाहीत. तपास हा प्रताप सरनाईक किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्या बापाच्या घरचा नाही. एकनाथ शिंदे यांनी जोशी यांच्या फोनवरून CP यांना फोन लावला. एकनाथ शिंदे यांच्या फोनची पोलिस डायरी असेल. मुख्यमंत्री महोदय आणि पोलिस महासंचालक यांना विनंती करतो, ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला त्यांची बदली व्हावी. प्रताप सरनाईक हा बांगलादेश आणि पाकिस्तान नाही. एकनाथ शिंदे तपासात हस्तक्षेप करत आहेत हे अक्षम्य आहे. दाढीवाला अजगर एका वेळेपर्यंत गिळू शकते पण संविधान सोडणार नाही असेही ते म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us