Chandrapur : शेतकऱ्यांसाठी महिलेचा अजब नवस, चक्क अडीच लीटर…

| Updated on: Jan 12, 2023 | 5:03 PM

तेलंगणाच्या थोडासम घराण्यातील महिला ही परंपरा पाळून शेतकऱ्यांना सुबत्ता मिळावी, शेतकऱ्यांची घरे धनधान्यांनी भरावीत यासाठी हे पारंपारीक कृत्य श्रद्धेने करीत असतात. सन 1961 पासून या गावात ही परंपरा सुरू झाली असून या घराण्यातील 20 महीलांनी आतापर्यंत या थोडासम घराण्याची परंपरा पाळल्याचे म्हटले जात आहे.

Chandrapur : शेतकऱ्यांसाठी महिलेचा अजब नवस, चक्क अडीच लीटर...
Telangana
Image Credit source: Telangana
Follow us on

तेलंगणा : आपल्या पारंपारिक रितीरीवाजातून ( tradition ) समाजात अनेक गोष्टी श्रद्घापूर्वक केल्या जात असतात. आता तेलंगणा ( Telangana ) राज्यातील एका जत्रेत शंभरवर्षांपासून चालत आलेल्या पारंपारिक धार्मिक श्रद्घेतून चंद्रपूरच्या 62 वर्षीय महिलेने चक्क दोन लिटर तीळाचे तेल पिण्याचे अजब कृत्य केले आहे. या श्रद्धेमागे काय आहे कारण जाणून घेऊया…

मेश्राम नागूबाई या आदीवासी महिलेने तेलगणा येथील अदीलाबाद जिल्ह्यातील पाच दिवसांच्या यात्रेत हे अजब नवस केले आहे. या यात्रेचे नाव कामदेव जत्रा असून नरूर मंडळाने ही पाच दिवसांची कामदेव जत्रा आयोजित केली होती. या यात्रेत शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे जगात शांती निर्माण व्हावी या नवसासाठी या मूळच्या महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या रहीवासी असलेल्या महिलेने हे अजब काम केले आहे.

या महाराष्ट्रातील महिलेने तेलंगणाच्या एका यात्रेत घरगुती घाण्यापासून तयार केलेले दोन लिटर तिळाचे तेल प्राशन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही महिला चंद्रपूरच्या जीविती तालूक्याच्या कोडेपूर गावची रहीवासी असल्याचे म्हटले जात आहे. तेलंगणाच्या या गावात घराण्याची परंपरा म्हणून कामदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी घराण्याची परंपरा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात घरगुती तीळाचे तेल पिण्याचे व्रत पाळून या वार्षिक जत्रेची सुरूवात करीत असतात.

तेलंगणाच्या थोडासम घराण्यातील महिला ही परंपरा पाळून शेतकऱ्यांना सुबत्ता मिळावी, शेतकऱ्यांची घरे धनधान्यांनी भरावीत यासाठी हे पारंपारीक कृत्य श्रद्धेने करीत असतात. सन 1961 पासून या गावात ही परंपरा सुरू झाली असून या घराण्यातील 20 महीलांनी आतापर्यंत या थोडासम घराण्याची परंपरा पाळल्याचे म्हटले जात आहे. मेश्राम नागूबाई यांनी ही परंपरा पाळण्याची आव्हान स्वीकारल्याने त्यांचे गावच्या मंदिर समितीने जोरदार स्वागत केले आहे. आता पुढील दोन वर्षे ते अशाच प्रकारे तेल पिणार आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक या जत्रेत सहभाग घेण्यासाठी दरवर्षी येत असतात.