Shivsena vs BJP : भाजपला शिंदेंची भीती वाटू लागली का? भाजपच्या बड्या नेत्याने मोजक्या शब्दात दिलं उत्तर, म्हणाले…

sudhir mungantiwar : मनोज जरांगे यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं आहे. या वादावर भाजपच्या बड्या नेत्याने भाष्य केलं आहे.

Shivsena vs BJP : भाजपला शिंदेंची भीती वाटू लागली का? भाजपच्या बड्या नेत्याने मोजक्या शब्दात दिलं उत्तर, म्हणाले...
eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 8:33 AM

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. भाजपमधून एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी कोणी विडा उचलला आहे, असा सवाल रामदास कदम यांनी केला. रामदास कदम यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. ऑडिओ क्लिपवरून महायुतीतच सुरू झालेल्या वादावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी महायुतीमधील वादावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणातील परिपक्वता वाढणे आवश्यक आहे.  फडणवीसांना संपवण्याची सुपारी कोणी घेतली होती, असा सवाल उपस्थित केल्यावर मुनगंटीवार म्हणाले, ‘ जनतेचा आशीर्वाद हा पद असणे, नसण्याशी नसेल. जनतेचा आशीर्वाद पदाशी संबंध नसतो. तर कामाशी असतो’. भाजपला शिंदेंची भीती वाटू लागली का, असा सवाल केल्यावर मुनगंटीवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंची भीती कशाला वाटेल, शिंदे आमचे मित्र आहेत. पुढेही राहतील’.

Loading...

ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेल्या वादावर मुनगंटीवार म्हणाले, महायुतीत असे एकमेकांवर विधाने होऊ नयेत. अशा कपोलकल्पित क्लिपकडे कुणी लक्ष देऊ नये. हा राजकारणाचा डावपेचाचा भाग असू शकतो. कॉमनसेन्स नावाचा एक शब्द आहे. असं कुणी 500 कोटी देईल का…जरांगे देखील सच्चे कार्यकर्ते आहेत, ते कशाला 500 कोटी घेतील’.

चंद्रकांत खैरेंचा महायुतीवर मोठा आरोप 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आधी मनोज जरांगे पाटलांना मोठं केलं, आता बाजूला का करता? असा सवाल खैरे यांनी केला. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी खैरे यांनी केली. ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव असल्याने सरकारने निर्णय घ्यावा.  500 कोटींच्या कथित व्यवहाराची चौकशी करावी.  डॉ. श्रीकांत शिंदेंच्या भूमिकेची चौकशीची व्हावी. खरंतर शेतकरी प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आरोप केले जात आहेत, असा संशय देखील खैरे यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us