अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक, भरसभेत डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?
बारामती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले.

दिवगंत अजित पवारांच्या निधनाला 8 महिने झाले आहेत. अजितदादांच्या निधनानंतरही बारामतीमधील कुटुंबाील सदस्य आणि कार्यकर्ते त्यांची आठवण काढत असतात. बारामती आणि अजितदादांचं एक वेगळं नातं होतं. शहरात त्यांच्या पुतळ्याचं देखील अनावरण झालं आहे. अजितदादा आठवड्यातून एक दिवस खास बारामतीच्या जनतेसाठी काढत होते. याच बारामतीत सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बँकेच्या सभेत उपस्थितांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या आठवणीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामती सहकारी बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उपस्थितीत ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची आठवण काढली. त्यानंतर त्यांचे डोळे हजर राहायचे. त्यांनी बारामती सहकारी बँकेचे सभासद आणि अजितदादांची आठवण सांगितली. ‘आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादाना वंदन करते. नवरात्र. दसरा आणि दिवाळीच्या आजच शुभेच्छा देते. मला वाटलंच नव्हतं की, मला अशा बैठका घ्याव्या लागतील. अजितदादांची सर कोणालाच येणार नाही. मला माफ करा, असं म्हटल्यानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. बारामती आणि दादांचं नात एवढं होत की, दादांशिवाय ही गोष्ट अपूर्ण वाटते. गेल्या पाच वर्षांमध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम केलं आहे’.
बँकेची कामगिरी चांगली सुरू आहे. बँकेने या आर्थिक वर्षात नफा देखील मिळवला आहे. आता पुढची दिशा निश्चित केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात बँकेचा विस्तार होताना पाहत आहोत, असे म्हणत सुनेत्रा पवारांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी बँकेच्या नफ्याची आकडेवारी देखील सांगितली. तत्पूर्वी, अजितादादांनंतर आता सुनेत्रा पवार यांनी बँकेचा कारभार हाती घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. त्यावेळी बँकेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले होते. बँकेचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं, पारदर्शकपणे आणि सर्वसामान्यांच्या हिताचं होईल, यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलं होतं.