प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुलाच्या जबाबानंतर ठाण्यातील बडा नेता अडचणीत? तपासही CID करणार

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुलाच्या जबाबानंतर ठाण्यातील बडा नेता अडचणीत सापडला आहे. आथा या प्रकरणाचा तपास CID करणार आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुलाच्या जबाबानंतर ठाण्यातील बडा नेता अडचणीत? तपासही CID करणार
pradip purnekar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 9:32 AM

ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूर्णकर हत्या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी इतर पप्या शिंदे यांच्यासहित इतर संशयिताना ताब्यात घेतलं आहे. ठाण्यात पूर्णेकरांच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी महापौर मिनाक्षी शिेंदे , त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचं नाव एफआयआरमध्ये टाकण्याची मागणी केली. त्यानंतर पुरवणी जोडून पू्र्णेकरांच्या मुलाला जबाब नोंदवण्यात आला आहे. तर आता या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे गेला आहे.

पूर्णेकरांच्या हत्येमागे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या प्रकरणात त्यांचं नाव एफआयआरमध्ये टाकण्यासाठी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पूर्णेकरांच्या मुलाचा जबाब घेतला. आता या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचे आरोप शिंदे गटाचे आरोप मिनाक्षी शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत.

Loading...

काल रात्री कापुरबावडी पोलीस स्थानकातून ठाणे गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आलाय. काल कापुरबावडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी पप्या शिंदे याला काल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ठाणे गुन्हे शाखेने काल प्रदीप पूर्णेकर यांचा मुलाचा जबाब नोंदवला. गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग झाल्यानंतर काल राम पूर्णेकर यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या घटनेची माहिती आणि संशयित आरोपीची नावे जबाबात नोंद झाली आहेत. तत्पूर्वी, पूर्णेकर प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू होता. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास डीसीपी अमर जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा देखील शोध गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस करत आहे.

मिनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं की, माझ्या घरी कट शिजल्याचा आरोप केला जात आहे. ते माझ्या घरी कधी होते, त्यांना त्याविषयी पुरावा द्यावा लागेल. बोलायचं असल्याने काही बोलायचं. पूर्णकरांच्या मृत्यूने लोकांमध्ये रोष आहे. ते रागात बोलत असतील, परंतु आरोप करण्याआधी विचार केला पाहिजे. प्रत्येकवेळी मिनाक्षी शिंदे किंवा माझ्या पतीचे नाव वापरून राजकारण करायचं. पूर्णकरांची हत्या झाली आहे. आता याचं राजकारण करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत येणे ही दुर्दैवी बाब आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us