मुंबईपाठोपाठ ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

| Updated on: Dec 30, 2020 | 10:09 PM

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. (Thane Schools closed till 15 January)

मुंबईपाठोपाठ ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Follow us on

ठाणे : अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नुकतंच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. (Thane Schools closed till 15 January)

ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आहे. मात्र अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे इतर राज्यांतील कोरोनाची स्थिती पाहता, सर्व जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनपा आयुक्तांशी विचारविनिमय करुन हा निर्णय घेतला आहे.

ऑफलाईन शाळा बंद ठेवण्यात येणार असल्या, तरी ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद

दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Thane Schools closed till 15 January)

मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यांतील करोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या घातक अवताराची भारतात एन्ट्री

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या घातक अवतारानं भारतामध्ये एन्ट्री केली आहे. देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. या सहा व्यक्ती ब्रिटनमधून भारतात परतले होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे. कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे. (Thane Schools closed till 15 January)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!