AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Mumbai schools closed till 15 January).

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
| Updated on: Dec 29, 2020 | 6:54 PM
Share

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांंबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे (Mumbai schools closed till 15 January).

मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यांतील करोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत (Mumbai schools closed till 15 January).

कोरोनाच्या घातक अवताराची भारतात एन्ट्री

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या घातक अवतारानं भारतामध्ये एन्ट्री केली आहे. देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. या सहा व्यक्ती ब्रिटनमधून भारतात परतले होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे. कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.