दादांच्या आजपर्यंतच्या कष्टाचं फळ मिळालं, सुनेत्रा पवार यांचं श्री सोमेश्वर कारखाना निवडणूकीवर भाष्य
महाराष्ट्रातील दुष्काळा संदर्भात काही दिवसापूर्वीच आम्ही बैठक घेतलेली आहे, आणखीन पुढे काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनेल’ने श्री सोमेश्वर सहकाही साखर कारखान्याच्या निवडणूकीत २१ – ० ने विजय मिळवला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकरी तसेच अन्य विषयावर आपली मते मांडली आहेत. दादांच्या केलेल्या कष्टाचा हे फळ आहे. शेतकऱ्यांबाबतची दादांची भावना अशी होती की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. शेवटचा शेतकरी सुखी झाला पाहिजे. गेली ३४ वर्ष दादांनी खूप कष्ट केले आहेत. यावर्षी देशातील उच्चांक भाव साखर कारखान्याने दिला आहे असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच दुष्काळाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी भयानक दुष्काळ आहे, अनेक ठिकाणी मी जाऊन आले आहे. सरकार सुद्धा आणि केंद्राची टीम सगळीकडे जाऊन इन्स्पेक्शन करत आहे. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी लवकरच निर्णय होणार आहे. केंद्राची टीम राज्यात नुकसानीची तपासणी करीत आहे, तोपर्यंत राज्याची टीम देखील मदतीला आहे. आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी तर्फे देखील मदत दिली जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पदवीधर निवडणूक
शशिकांत शिंदे पदवीधर निवडणूकीविषयी विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या की या सगळ्या विषयांवर नंतर बोलेल. दादा नेहमीच निवडणुका जिंकण्यासाठी लढायचे असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे खेळाडू आशियाई स्पर्धात उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांनी अशीच कामगिरी करावी अशी इच्छा आहे
असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.