Latur : लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘पॅटर्न’ राज्यपालांना भावला, राज्यभर उपक्रम राबवण्याचे केले आवाहन..!

| Updated on: Aug 20, 2022 | 5:59 PM

सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यावर लातूर जिल्हा कायम आघाडीवर राहिलेला आहे. जिल्ह्यात पाण्याचा स्त्रोत नसला तरी बोअरचे पुन्नर्रभरण आणि विविध माध्यमातून लातूरकर पाण्याची बचत करीत आहेत. यातच येथील सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळला आहे.

Latur : लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा पॅटर्न राज्यपालांना भावला, राज्यभर उपक्रम राबवण्याचे केले आवाहन..!
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी विविध विभागाचा आढावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मांडला
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : वेगवेगळ्या विधानावरुन चर्चेत असलेले (Governor Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लातूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कोश्यारी यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनातील विविध विभागाच्या बैठका घेतल्या. यामध्ये (Public Works Department) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यारील (Rain Water) पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. त्याचे राज्यपाल यांनी तोंडभरुन कौतुक केले तर असाच उपक्रम राज्यभर राबवला पाहिजे असेही आवाहन केले आहे. या प्रयोगामुळे पाण्याची बचत तर होणारच आहे पण पाणीपातळीतही वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाचे पाणी मुरले जमिनीत

सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यावर लातूर जिल्हा कायम आघाडीवर राहिलेला आहे. जिल्ह्यात पाण्याचा स्त्रोत नसला तरी बोअरचे पुन्नर्रभरण आणि विविध माध्यमातून लातूरकर पाण्याची बचत करीत आहेत. यातच येथील सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळला आहे. तर पाणीपातळीत वाढ होण्यासही मदत होणार आहे. हा उपक्रम नेमका काय आहे? याची माहिती सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली.

सोयाबीन उत्पादकांना मोलाचा सल्ला

मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी लातूर ही महत्वाची बाजारपेठ आहे. शिवाय सोयाबीनचे दर ठरवण्यामध्येही या बाजारपेठेची महत्वाची भूमिका असते. उत्पादनाबरोबरच याच जिल्ह्यामध्ये प्रक्रिया उद्योगही उभारले गेले आहेत, त्याचे राज्यपालांनी कौतुक केले. शिवाय काळा सोयाबीन हा स्वादासाठी आणि प्रोटीनयुक्त असतात. काळा सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा असेही आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल,अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकाऱ्यांनी करुन दिली जिल्ह्याची ओळख

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सादरीकरणाद्वारे लातूर जिल्ह्यातील पर्यटन, सिंचन, इतिहासिक स्थळे, पर्जन्यमान, लोकसंख्या आणि जिल्ह्याची एकूण पाणी पातळीची माहिती दिली. लातूर जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र कमी आहे ते वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिला.