AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : धमकी प्रकरणीतील एका संशयिताला विरारमधून अटक, एटीएसकडून कसून चौकशी सुरु

पंजाबमधल्या एका स्फोटकांच्या प्रकरणात आरोपीला महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसने शिर्डीमधून आरोपीला अटक केली आहे.

Mumbai : धमकी प्रकरणीतील एका संशयिताला विरारमधून अटक, एटीएसकडून कसून चौकशी सुरु
विवेक फणसाळकर, मुंबई पोलीस आयुक्तImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2022 | 5:41 PM
Share

मुंबई : मुंबईत (Mumbai) 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना (Police) पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी सांगितले. तसेच त्यांनी आम्ही सगळी काळजी घेतली असून लवकरचं याची चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तासाभराच्या आता मुंबई पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. विरारमधील (Virar) एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित इसमाची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्तरप्रदेशातली आहे.

वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मॅसेज

शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करुन शहर उडवलं जाईल असा मॅसेज दिला होता. फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला 26/11 हल्ल्या सारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.

पंजाबमधील स्फोटाच्या प्रकरणातील आरोपीला शिर्डीत अटक

पंजाबमधल्या एका स्फोटकांच्या प्रकरणात आरोपीला महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसने शिर्डीमधून आरोपीला अटक केली आहे. एटीएसने आरोपीला अटक करून पंजाब पोलिसांच्या हवाली केलं. 16 ऑगस्टला पंजाबमधील एका पीएसआयच्या गाडीत आयईडी ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रातून अटक केली आहे. या प्रकरणात याआधीच पंजाब पोलिसांनी दोन आरोपीना अटक केलेली आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.