AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Dec 28, 2025 | 10:15 AM
Share

वर्षाच्या शेवटच्या रविवारी मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी ११ ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील फास्ट लोकल सेवा वळवण्यात येणार असून एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. प्रवाशांना विलंब होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वर्षाच्या शेवटच्या रविवारी मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी कामांसाठी घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांना काही प्रमाणात विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे डाउन जलद लोकल माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर अप जलद लोकल मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावरही याच वेळेत (सकाळी ११ ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत) अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गीकेच्या कामासाठी बोरीवली स्थानकात ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे आज आणि उद्या एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, रविवारचा प्रवास नियोजित करत असाल तर वेळापत्रक पाहून प्रवासाची योजना करावी.

Published on: Dec 28, 2025 10:11 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या