Tiger death | उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात विषप्रयोग?, वाघिणीसह 2 बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

| Updated on: Jan 02, 2021 | 8:41 AM

उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. (tiger found dead)

Tiger death | उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात विषप्रयोग?, वाघिणीसह 2 बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
Follow us on

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात (Umred-Karhandla-Pawani sanctuary) एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत (Death of Tiger)  आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शेजारीच गायीचे वासरुसुद्धा मृतावस्थेत आढळल्यामुळे वाघिणीवर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हा विषप्रयोग तीन ते चार दिवसांपूर्वी केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, विषप्रयोगाच्या आरोपाखाली एका शेतकऱ्याला अटक करण्यात आलं आहे. (tiger have been found dead in Umred-Karhandla-Pawani sanctuary)

वाघिणीच्या शेजारीच गायीचे वासरुही मृतावस्थेत

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड- कऱ्हाड-पवनी अभयारण्यात वाघांची संख्या बरीच आहे. या परिसरात शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. याच अभयारण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा मृतदेह आढळला आहे. तसेच, तिचे दोन्ही बछडेसुद्धा तिच्यासोबत मेलेले आढळले आहेत. विशेष म्हणजे या वाघिणीच्या शेजारीच गायीचे वासरुसुद्धा मृतावस्थेत आढळले आहे. त्यामुळे वाघिणीला मारण्यासाठी तिच्यावर विषप्रयोग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच हा विषप्रयोग तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

दीड महिन्यापूर्वी दोन वाघांचा बळी

ज्या ठिकाणी वाघिणींचा मृतदेह आढळला त्या परिसरात शेती असलेल्या शेतमालकाला अटक करण्यात आलीय. विषप्रयोग झाल्याची शक्यता लक्षात घेऊन वनाधिकारी आणि पोलिसांकूडन या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दीड महिन्यापूर्वीच दोन वाघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले आहेत. दोन महिन्यातं दोन वाघ, एक वाघीण, दोन बछडे यांच्या अचानकपणे मृत्यूमुळे आश्चर्य व्यक्त केले जातेय. तसेच, प्रकरणाची तपासणी सखोलपणे आणि जलदगतीने व्हावी अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

रणथंबोरच्या अभायारण्यात दोन वाघांमध्ये झाली जीवघेणी लढाई; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Chandrapur Tiger death : ‘त्याच’ तळ्याकाठी आणखी दोन वाघांचे मृतदेह, ताडोबातील संपूर्ण तलावात विष कालवलं?

Chandrapur Tiger Attack | राजुरात वाघाचा धुमाकूळ, 7 ग्रामस्थांचा बळी

(tiger have been found dead in Umred-Karhandla-Pawani sanctuary)