AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Tiger Attack | राजुरात वाघाचा धुमाकूळ, 7 ग्रामस्थांचा बळी

राजुरा (Rajura) तालुक्यात ७ ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या RT1 वाघाला (Tigre Attacks) पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Chandrapur Tiger Attack | राजुरात वाघाचा धुमाकूळ, 7 ग्रामस्थांचा बळी
| Updated on: Oct 03, 2020 | 11:12 AM
Share

चंद्रपूर : राजुरा (Rajura) तालुक्यात ७ ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या RT1 वाघाला (Tiger Attacks) पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या वन व्याप्त गावांमध्ये या वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागाची विविध पथके व एकूण 150 कर्मचारी या भागात अभियान राबवित आहेत. स्वतः वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी झाले आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही सातवा बळी गेल्याने गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे (Tiger Attacks on villagers in Rajura Chandrapur District).

वनविभागाला चकमा देत वाघाचा सातवा बळी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या नवेगाव खेडे या गावातील गोविंदा भीमराव मडावी या शेतकऱ्याला  शेतात काम करत असताना, वाघाने हल्ला (Tiger Attacks) करत ठार केले. 28 सप्टेंबर रोजी घडलेली ही घटना राजुरा वनविभागातील RT1 वाघाने बळी घेतल्याची सातवी घटना आहे. या वाघाच्या बंदोबस्तासाठी गेले कित्येक दिवस  वनविभागाचा चमू या परिसरात तैनात आहे. मात्र तरीही, सुमारे पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रात वाघ (Tigre) वनविभागाच्या प्रयत्नांना चकमा देत ग्रामस्थांवर हल्ले करत आहे.

राजुरा तालुक्यात वाघाची दहशत

राजुरा (Rajura) तालुक्यात या RT1 वाघाच्या हल्ल्यात याआधी, 4 जानेवारी रोजी संतोष खामनकर या ४५ वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाला होता. तर, 25 डिसेंबरला चिचबोडी येथील मंगेश कोडापे, 25 नोव्हेंबरला मूर्ती येथील श्रीहरी साळवे, 18 जानेवारी 2019ला जोगापूर येथील वैशाली तोडासे, 6 मार्च रोजी चुनाळा येथील उद्धव टेकाम  आणि  18 ऑगस्ट रोजी नवेगाव येथे वासुदेव कोंडेकर यांचाही वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. (Tiger Attacks on villagers in Rajura Chandrapur District).

शेती-शिवारे सामसूम

एकीकडे वाघाचे हल्ले सुरू असताना, या भीतीने शेती शिवारे मात्र सामसूम झाली आहेत. पिकांना पाणी देण्याच्या आणि इतर शेती उपयोगी कामाच्या वेळेस वाघाची दहशत निर्माण झाल्याने जनावरे देखील गोठ्यात कैद करुन ठेवावी लागत आहेत. घरचा एखादा कर्ता पुरुषच गमावल्यानंतर शासनाने दिलेल्या लाखो रुपयांचे करायचे काय?, असा संतप्त सवाल या भागातील नागरिक विचारत आहेत. ‘प्रयत्न सुरू आहेत’  असे उत्तर नको, तर ‘वाघाला जेरबंद करा’ अशी आर्त हाक परिसरातील जनतेने दिली आहे.

RT1 या वाघाने आता पर्यंत या भागात 7 लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण आहे. या आधीसुद्धा या वाघाला पकडण्यासाठी 2 वेळा आदेश निर्गमित करण्यात आले होते. पण, यात यश आलेले नाही. नवेगाव येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर आता या वाघाला गोळ्या घाला, अशीच मागणी पुढे येत आहे. दुसरीकडे वाघाचा मार्ग व त्याचे वर्तन लक्षात घेता एक विशिष्ट धोरण आखून त्याला जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ताज्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा या वाघाला जेरबंद करण्याची मोहित तीव्र झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राखीव वनक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या वर्षभरात वाढ झाली असून वाघ मृत्यूच्या संख्येतही चिंताजनक वृद्धी दिसून येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वंकष उपाय योजना करून त्याचा केंद्रबिंदू शेतकरी असणे गरजेचे असल्याचे आता बोलले जात आहे.

(Tiger Attacks on villagers in Rajura Chandrapur District).

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी : 

संबंधित बातम्या : 

Chandrapur Tiger death : ‘त्याच’ तळ्याकाठी आणखी दोन वाघांचे मृतदेह, ताडोबातील संपूर्ण तलावात विष कालवलं?

‘मोगली’नंतर खराखुरा ‘बगिरा’ चंद्रपूरच्या ताडोबात दिसला! 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.