गोळीबारानंतर एकनाथ शिंदे टायगरच्या भेटीला, प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा भडकला; म्हणाला…
Tiger shroff Case : राम पूर्णेकर यांचा एकनाथ शिंदेंवर संताप व्यक्त केला आहे. टायगर श्रॉफच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले, मात्र प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यास वेळ नाही, असं म्हणत राम पूर्णेकर यांनी टीका केली आहे.

मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. या गोळीबारात टायगर श्रॉफसह तिघे जण जखमी झाले. गोळीबारानंतर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या टायगर श्रॉफ सुखरूप आहे. या गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच तातडीने टायगरच्या भेटीला गेले. टायगर श्रॉफची भेट घेतल्याने दिवगंत प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकरांनी एकनाथ शिंदेंवर संताप व्यक्त केला आहे. टायगरला भेटायला वेळ आहे. परंतु प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यास वेळ नाही, असं म्हणत राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर रुग्णालयातून उपाचारानंतर घरी आणलं. त्याला वांद्रे येथील घरी आणलं. गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अभिनेता टायगर श्रॉफची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी टायगरच्या कुटुंबीयांना धीर दिला. एकनाथ शिंदे यांनी घरात जाऊन टायगरच्या तब्येतीची विचारपूस केली. परंतु या भेटीवर ठाकरे गटाचे दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकरांनी नाराजी व्यक्त केली. राम पूर्णेकर यांच्या नाराजीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. राम पूर्णेकर यांनी म्हटलं की, ‘ठाण्यातील हत्येला १९ दिवस उलटल्यानंतर ही कुटुंबियांची भेट न घेणारे उपमुख्यमंत्री टायगर श्रॉफची विचारपूस करायला घरी पोहचले आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या भेटीला मात्र वेळ नाही, याला म्हणतात शिवसेना मीनाक्षी राजा पर्व, असा पोस्टमध्ये उल्लेख आहे.
पूर्णकरांच्या कुटुंबीयांकडून वारंवार मागणी, तरीही….
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 19 दिवस उलटूनही एकनाथ शिंदेंनी कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर कुटुंबीयांच्या वारंवार मागणीनंतरही शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी भेट न घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे टायगरची भेट घ्यायला पोहोचले, पण प्रदीप पूर्णेकर यांच्याकडे यायला वेळ नाही, असं म्हणत राम पूर्णेकर यांनी निशाणा साधला आहे. राम पूर्णकरांच्या टीकेनंतर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.