Tukaram Mundhe: दुष्काळात खचलेल्या शेतकऱ्याला दाखवली नवी दिशा, म्हणूनच तुकाराम मुंढेंना Hats Off

Tukaram Mundhe To Faremers: तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना आता एक मोलाचा सल्ला दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी कशी हाताळावी हे आता तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Tukaram Mundhe: दुष्काळात खचलेल्या शेतकऱ्याला दाखवली नवी दिशा, म्हणूनच तुकाराम मुंढेंना Hats Off
| Updated on: Oct 18, 2026 | 3:16 PM

Tukaram Mundhe To Farmers: दुष्काळाकडे केवळ समस्या म्हणून पाहण्याऐवजी त्यातून कोणत्या संधी निर्माण करता येतील, याचा विचार करायला हवा असा सल्ला IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी या कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय, हायड्रोपोनिक्स आणि जलसंधारणाचे महत्त्व सांगितले. दुष्काळ का पडतो आणि पुढील सहा ते सात महिन्यांत त्यावर मात करण्यासाठी काय करावे याचा विचार करण्याची गरज असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन केल्यास कमी पाण्यात चारा उपलब्ध करणे शक्य होऊ शकते. या पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे, दर्जेदार दूध उत्पादन, दुग्ध प्रक्रिया आणि दुधावर आधारित उद्योगांमधूनही ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे ते स्पष्ट म्हणाले.

Loading...

दरवर्षी टँकर आणि ट्यूबवेलची मागणी केली जाते; मात्र या उपायांचा दीर्घकालीन परिणाम काय होतो, याचा विचार करायला हवा. गावातील पाण्याचे स्रोत, विहिरी आणि ट्यूबवेल आटत असताना पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गावातील रस्ते आणि इतर बांधकामांसाठी काँक्रिटीकरण करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता यांचाही विचार करायला हवा. आवश्यक ठिकाणी बांधकाम करावे; मात्र पावसाचे पाणी गावात आणि शेतात टिकून राहील, यासाठी नियोजन असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळात दुग्ध व्यवसायाची संधी

तुकाराम मुंढे यांनी दुग्ध व्यवसायाकडे ग्रामीण भागातील उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहण्याचा सल्ला दिला. अन्न व औषध प्रशासनाच्या कामात दुधाशी संबंधित बाबींचा समावेश प्रचंड आहे, देशातील दुधाची मागणी,त्यातून उत्पादकांना मिळणारा दर आणि या क्षेत्रातील संधींचा उल्लेख त्यांनी केला केला. पशुसंवर्धन विभागात काम करताना दुग्ध व्यवसायाकडे उद्योजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याते त्यांनी निर्दशनास आणून दिले. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी चारा आणि पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. मात्र, आधुनिक पद्धतींचा वापर केल्यास कमी पाण्यातही चारा उत्पादन आणि दुग्ध व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात,असे तुकाराम मुंढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us