मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका! आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी

Artificial Paneer : FDA ने महाराष्ट्रात अँनॉलॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत राजपत्र जारी केले आहे.

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका! आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी
artificial paneer ban
Image Credit source: Google
| Updated on: Aug 04, 2026 | 11:42 PM

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई केली जात आहे. अशातच आता FDA ने महाराष्ट्रात अँनॉलॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत राजपत्र जारी केले आहे. आता आगामी काळात आर्टिफिशियल पनीर विकल्यावर कारवाई होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आर्टिफिशियल पनीरवर एक वर्षाची बंदी

भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. रेस्टॉरंट, हॉटेल्स व कॅटरिंग सेवेत आर्टिफिशियल पनीर वापरत असल्याचा केला पाचपुते यांनी केला होता. महाराष्ट्रात 70 टक्के पनीरचे पदार्थ हे आर्टिफिशियल पनीर पासून तयार होतात असा दावा करत अशा पनीरवर बंदी घालण्याची मागणी पाचपुते यांनी केली होती. त्यानंतर आर्टिफिशियल पनीरचा मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याचे एफडीएने आदेश दिले होते, मात्र आदेशाचे पालन होत नसल्याने एफडीएकडून आता थेट बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आता अशा प्रकारचे पनीर विकल्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे.

विक्रम पाचपुतेंनी मानले आभार

FDA च्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटले की, मार्च 2025 मध्ये मी आर्टिफिशयल पनीरचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी माझी मागणी अशी होती की, राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यापैकी 70 टक्के पनीर हे फेक आहे. अशा पनीरवर तात्काळ बंदी आणण्याची मागणी मी केली होती. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी एक आदेश जारी केला आहे. यात आर्टिफिशियल पनीरच्या वापरावर आणि विक्रीवर एक वर्षांसाठी बंदी आणली आहे. त्यांचे मी आभार मानतो.

एनालॉग पनीर म्हणजे काय?

एनालॉग पनीर म्हणजे दुधापासून न बनवता, रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले कृत्रिम किंवा बनावट पनीर होय. बाजारात आणि हॉटेल्समध्ये मिळणारे जवळपास 70 ते 75 टक्के पनीर हे कृत्रिम (एनालॉग) असून ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. कारण हे पनीर बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी स्वस्त पाम तेल, स्टार्च, वनस्पती फॅट्स, स्किम्ड मिल्क पावडर आणि केमिकल्स एकत्र करून ते तयार केले जाते. ओरिजनल पनीरच्या तुलनेत हे खूप स्वस्त असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us