TV9 Marathi महाराष्ट्राचा महासंकल्प Agriculture Conclave 2026 – शेतीतून समृद्धीकडे..
TV9 मराठी आयोजित 'महाराष्ट्राचा महासंकल्प – शेतीतून समृद्धीकडे' (Season 2) हा Agriculture Conclave दि. 22 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. 'नव्या शेतीची नवी दिशा' या मुख्य विषयाखाली आधुनिक तंत्रज्ञान, युवकांचा सहभाग, कृषी उद्योगातील संधी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासावर तज्ज्ञ, उद्योजक व शेतकऱ्यांसोबत सखोल चर्चा होईल. हा कार्यक्रम YouTube वर थेट प्रसारित होईल.

महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील बदलत्या संधी, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि युवकांचा वाढता सहभाग या पार्श्वभूमीवर TV9 मराठी आयोजित “महाराष्ट्राचा महासंकल्प – शेतीतून समृद्धीकडे” (Season 2) हा विशेष Agriculture Conclave दि. 22 एप्रिल 2026 रोजी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येत आहे.
या वर्षीचा मुख्य विषय आहे – “नव्या शेतीची नवी दिशा”. या Conclave मध्ये राज्यातील आघाडीचे उद्योगपती, कृषी तज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी सहभागी होणार असून शेती क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड, आव्हाने आणि संधी यावर सखोल चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्यं :
• आधुनिक शेती व तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
• बायोफ्युएल, फूड प्रोसेसिंग व डेअरी क्षेत्रातील संधी
• कृषी उद्योगाचे अर्थकारण व धोरणात्मक नियोजन
• युवकांसाठी Agri Startup व Entrepreneurship मार्गदर्शन
• महिला उद्योजकांचा सहभाग व प्रेरणादायी अनुभव
• Agri Ecosystem ते Industry – संपूर्ण मूल्यसाखळीवर चर्चा
प्रमुख मान्यवर सहभागी :
• श्री. दिलीप स्वामी – व्यवस्थापकीय संचालक, महाबीज
• श्री. बी. बी. ठोंबरे – MD, Natural Sugar & Allied Industries
• श्री. विद्याधर अनास्कर – प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
• श्री. संजय देशमुख – CEO, Pearl Enterprises
• श्री. कुंदन देशमुख – MD, Parbhani Agro Tech
• श्री. रितेश मिश्रा – CEO, Lead Better Seeds (Mahyco Group)
• श्री. रणजित देशमुख – अध्यक्ष, राजहंस दूध संघ
• श्री. मुनीश शर्मा – महासंचालक, MIT
• श्री. राम भोगले – अध्यक्ष, भोगले ऑटोमोटिव्ह
• तसेच इतर मान्यवर तज्ज्ञ व उद्योजक
कार्यक्रमाचे उद्दिष्ट :
• शेतीला “व्यवसाय” म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण करणे
• युवकांना शेतीत व Agri Business मध्ये सहभागी करणे
• नव्या तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न वाढीचे मार्ग दाखवणे
• ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे
प्रसारण (Broadcast) :
हा संपूर्ण कार्यक्रम TV9 Marathi YouTube Live वर थेट प्रक्षेपित केला जाणार असून निवडक सत्रांचे प्रसारण TV9 मराठी वाहिनीवर करण्यात येईल.
“महाराष्ट्राचा महासंकल्प – शेतीतून समृद्धीकडे” हा केवळ एक कार्यक्रम नसून शेती क्षेत्रातील नव्या संधी, विचार आणि दिशा देणारा एक प्रभावी मंच आहे, जो शेतकरी, युवक आणि उद्योग यांना एकत्र आणून समृद्धीचा मार्ग दाखवतो.