Operation Tiger : ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत, ऑपरेशन टायगर 2 बद्दल शिंदे सेनेच्या आमदाराचं महत्वाचं वक्तव्य

ठाकरे गटात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑपरेशन टायगर 2 बद्दल शिंदे सेनेच्या आमदाराचं महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Operation Tiger : ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत, ऑपरेशन टायगर 2 बद्दल शिंदे सेनेच्या आमदाराचं महत्वाचं वक्तव्य
uddhav thackeray news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 8:30 AM

गिरीश गायकवाड : राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने भुसावळमधील शरद पवार गटाचे 11 नगरसेवक फोडले होते. त्यानंतर आता शिंदे गटाने हळूच त्यांचा मोर्चा ठाकरे गटाकडे वळवल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने 6 खासदार फोडले. आता खासदारानंतर आमदार देखील फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी केला आहे. राज्यात येत्या काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर-4’ पाहायला मिळेल, असा दावा केला आहे. ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे विधान मुरजी पटेल यांनी केलं आहे. संपर्कात असलेले आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मुरजी पटेल यांनी केला आहे. आमदारांनंतर ठाकरे गटातील नगरसेवक देखील शिंदे गटात प्रवेश करतील, असेही संकेत दिले आहेत. अंधेरी पूर्वमध्ये ‘आवाज शिवसेनेचा, जल्लोष स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमात हे विधान केलं आहे. मुरजी पटेल यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मुरजी पटेल यांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. काही महिन्याआधीच ठाकरेंना खासदारांच्या बंडखोरीचा धक्का बसला आहे. लोकसभा खासदारांची शिंदेंना साथ दिल्याने राष्ट्रीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाला कोणतीही आडकाठी आली नसल्याचेही दिसून आले. आता आमदार जाणार असल्याच्या चर्चेने उधाण आलं आहे.

ठाकरेंच्या 14 आमदारांचा आखडा महत्त्वाचा ठरत आहे. सध्या ठाकरे गटाकडे एकूण 20 आमदार आहेत. या आमदारांपैकी दोन-तृतीयांश आमदारांनी एकत्रितपणे पक्षांतर केल्याने वेगळे राजकीय समीकरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता ठाकरेंच्या 14 आमदारांकडे विशेष लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंनी काही आमदारांच्या अज्ञात ठिकाणी भेटी घेतल्याच्या देखील चर्चा आहे. अलीकडेच महाविकास आघाडीने आमदारांची बैठक बोलावली होती. त्यातील 60 पैकी 37 आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या भेटीला कोणीही दुजोरा दिलेला नाही. आता मुरजी पटेलयांचा दावा किती खरा ठरतो, हे पाहावे लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us